आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनमोल वारसा:नागपुरात उद्यापासून 3 दिवसीय नाणे प्रदर्शन, शिवकालीन प्राचीन ठेवा पाहण्याची संधी

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
प्रदर्शनात दुर्मिळ तसेच शिवकालीन नाणे पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.  - Divya Marathi
प्रदर्शनात दुर्मिळ तसेच शिवकालीन नाणे पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. 

न्युमिझमॅटिक रिसर्च इन्स्टिट्यूटतर्फे उद्या शुक्रवारपासून 3 दिवसीय अखिल भारतीय नाणे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. बर्डी येथील रामगोपाल माहेश्वरी सांस्कृतिक सभागृह (मोर भवन) येथे हे प्रदर्शन होणार आहे. या प्रदर्शनात दुर्मिळ ऐतिहासिक तसेच शिवकालीन नाणे पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.

प्रदर्शनाचे उद्घाटन पुरातत्व विभागाच्या सहायक संचालक जया वहाणे यांच्या हस्ते होणार आहे. बेंगळुरू येथील संग्राहक रेझवान रझाक यांना यावेळी ‘नागमणी-२०२२ जीवन गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. नाण्यांच्या माध्यमातून प्राचीन वारसा, संस्कृती आणि इतिहासाचे जतन करणे आणि नाण्यांचे अनमोल महत्त्व सांगून लोकांना अधिक जागरूक करणे, हा प्रदर्शन आयोजित करण्यामागचा उद्देश असल्याचे नाणे अभ्यासक अशोकसिंग ठाकुर यांनी सांगितले.

या प्रदर्शनात सर्वोत्कृष्ट तीन प्रवेशिकांना चषक देऊन पुरस्कृत केले जाईल. सांत्वनपर पारितोषिकेही दिली जातील. प्रदर्शनातील सर्व संग्राहक आणि सहभागींना ‘सहभाग प्रमाणपत्रे’ दिली जातील. सर्व पारितोषिकांचा निर्णय ज्युरीच्या स्वतंत्र पॅनेलद्वारे केला जाईल. 5 जून रोजी दुपारी 4 वाजता गव्हर्निंग कौन्सिल, इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेजचे प्रमुख नाणकशास्त्रज्ञ अशोक सिंग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली समारोप समारंभ होईल. पीयूष अग्रवाल, संजय मिश्रा, भरत सारिया, जी. सी. नागदेव, जगदीश अग्रवाल आणि अनुज सक्सेना हे न्यूमिझमॅटिक रिसर्च इन्स्टिट्यूटचे पदाधिकारी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...