आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  •  Coins Given By Sai Baba Come To Nagpur | Lakshmibai's Great Grandson Arun Gaikwad Come To Nagpur | Devotees Have Darshan Of The Holy Coin

साईबाबांनी दिलेली नाणी सामान्यांना पाहता येणार:लक्ष्मीबाईंचे पणतू अरुण गायकवाड नागपूर येणार, भक्तांना घेता येणार दर्शन

नागपूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जवळपास 105 वर्षापूर्वी श्रद्धा व सबुरीचे प्रतिक असलेल्या शिर्डीच्या साईबाबांनी स्वतः त्यांच्या सेवेत असलेल्या लक्ष्मीबाई (शिंदे) यांना समाधी घेण्यापूर्वी नऊ चांदीची नाणी दिली. या पावन नाण्याच सर्व सामान्य साई भक्तांना दर्शन व्हावे या संकल्पनेतून लक्ष्मीबाई (शिंदे) यांचे पणतू अरुण गायकवाड हे साई मंदिर भानेगाव (ता. सावनेर. जि. नागपूर) येथे 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता येत आहे.

साईबाबानी लक्ष्मीबाई (शिंदे) यांना दिलेल्या पावन नाण्याचे आवर्जुन दर्शन घ्यावे. असे आवाहन साई मंदिर व हनुमान मंदिर पंच कमिटी, भानेगाव यांनी केले आहे. महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्यातील पाथरी गावात साईबाबांचा जन्म 27 सप्टेंबर 1830 रोजी झाला होता. साईंच्या जन्म स्थळी एक मंदिर आहे. त्यात बाबांची आकर्षक मूर्ती आहे.

90 रुपयांच्या स्टॅम्पवर खरेदी

बाबांच्या या निवास स्थळी जुन्या वस्तू जसे भांडी, घट्टी आणि देवी-देवतांच्या मूर्ती आहे. जुन्या घराचे अवशेष सांभाळून ठेवण्यात आले आहे. ट्रस्टद्वारे हे घर साईबाबांचे वंशज रघुनाथ भुसारी यांच्याकडून 3 हजार रुपयात 90 रुपयांच्या स्टॅम्पवर खरेदी करण्यात आले होते. याशिवाय त्यांची कफनी वगैरे शिर्डी येथे सांभाळून ठेवले आहे.

पडक्या मशिदीत बसायचे

साईबाबा हे वयाच्या 16 व्या वर्षी शिर्डीला आले. साईबाबा लोकांना प्रथम दिसले तेव्हा ते कडुलिंबाच्या झाडाखाली बसलेले होते. तेव्हापासून ते नित्य नियमाने पाच घरी भिक्षा मागत. ते प्रथम द्वारकामाई नावाच्या पडक्या मशिदीत बसत होते व त्यानंतर चावडीत जात. श्री साईबाबाचे द्वारकामाईत 60 वर्षे वास्तव्य होते. मंगळवारी दसऱ्याच्या दिवशी 15 ऑक्टोबर, इ.स. 1918 रोजी साईबाबांनी समाधी घेतली.

साईबाबांच्या समाधीनंतर त्यांच्या भक्तांनी शिर्डीस मंदिर उभारले. या मंदिरामुळे शिर्डीस धार्मिक क्षेत्राचे महत्त्व आले असून दररोज लाखो भाविक साईबाबा मंदिरास भेट देण्यासाठी शिर्डीस येतात. दिवसेंदिवस भाविकांची संख्येत वाढ होत आहे.

शिर्डीच्या मंदिराची श्रीमंती

आयुष्यभर फकिराचे जीवन जगलेल्या साईबाबांच्या नावाने काढलेल्या संस्थानची झोळी जगभरातील लाखो भाविकांच्या दातृत्वामुळे भरली आहे. बाबांच्या नावाने सुरू करण्यात आलेले हे संस्थान करोडपती आहे. साईबाबांच्या मूर्तीवर दीड कोटींच्या हिरेजडित सुवर्ण मुकुटासह कोट्यवधींची आभूषणे घालण्यात येतात.

सोन्या-चांदीच्या वस्तू

शिर्डी संस्थानची स्थापना झाल्यावर 28 मे 1923 रोजी संस्थानने काही तुटलेली तांब्या-पितळेची भांडी व चांदीच्या दोन ताटल्या मोडून बाबांच्या आरतीसाठी तबक बनवले होते. आज बाबांचे सिंहासन व मंदिराच्या शिखरासह रोजच्या पूजेतील वापराच्या जवळपास सर्वच वस्तू सोन्याच्या व चांदीच्या आहेत. देशातील मोजक्या श्रीमंत संस्थानपैकी साई संस्थान एक आहे.

बातम्या आणखी आहेत...