आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:गोंदियात आ. विनोद अग्रवाल यांचे रस्त्याच्या मधोमध झोपून आंदोलन

गोंदिया3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
रस्त्याच्या मधोमध झोपून आंदोलन करताना आ. अग्रवाल व इतर. - Divya Marathi
रस्त्याच्या मधोमध झोपून आंदोलन करताना आ. अग्रवाल व इतर.

भरधाव टिप्परने दुचाकीला धडक दिल्याने खमारी येथील राजेश लिल्हारे या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. रस्ता अपघातातील मृत व्यक्तीला न्याय मिळावा, यासाठी आमदार विनोद अग्रवाल यांनी रात्री उशिरा रस्त्याच्या मधोमध झोपून आंदोलन केले.

बांधकाम ठेकेदाराने मृताच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती न देता मृतदेह घेऊन निघून गेल्याची माहिती मिळाली. मृताची पत्नी गरोदर आहे. या घटनेची माहिती मिळताच आमदार विनोद अग्रवाल घटनास्थळी पोहोचले आणि पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी रात्री उशिरा रस्त्याच्या मधोमध झोपून जनतेसोबत आंदोलनाची भूमिका घेतल्याने आमदार अग्रवाल संतप्त झाले. जोपर्यंत मृताच्या कुटुंबीयांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असे आमदार विनोद अग्रवाल यांनी सांगितले. तसेच या घटनेतील दोषी व ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आमदारांनी आमदार विनोद अग्रवाल यांनी मृताच्या कुटुंबीयांची भेट घेऊन ५० हजार रुपयांची आर्थिक मदत केली. यावेळी आ. विनोद अग्रवाल, सभापती मुनेश रहांगडाले, पंचायत समिती सदस्य कनीराम तावाडे, सरपंच होमेंद्र भांडारकर, शेखर वाढवे, रंजित गायधने, बाबा नागपुरे, सुरेश मचाडे,प्रल्हाद बनोटे व गावकरी उपस्थित होते.

या रस्त्याच्या कामाला गती देण्यात यावी, अशी मागणी संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी केली. मात्र आजतागायत प्रशासनाने या प्रकरणाची दखल न घेतल्याने या भागातील अनेकांना जीव गमवावा लागला.

बातम्या आणखी आहेत...