आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई:तीस हजारांची लाच घेताना आयुक्त अटकेत

नागपूर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रॅच्युइटीचे धनादेश देण्यासाठी दोन कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी १५ हजार या प्रमाणे ३० हजारांची लाच घेताना सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केंद्रीय सहायक कामगार आयुक्त विनय कुमार जयस्वाल यांना अटक केली.

लाच मागितलेले दाेन्ही कर्मचारी निवृत्त असून निवृत्तीच्या वेळी दोन्ही कर्मचाऱ्यांनी शासकीय निवासस्थान रिकामे केले नव्हते. त्यामुळे त्यांच्या विभागाने त्यांच्या ग्रॅच्युइटीचे प्रकरण सहायक कामगार आयुक्तांकडे सोपवले होते आणि ग्रॅच्युइटीची रक्कम सहायक कामगार आयुक्त कार्यालयात जमा केली होती. दोघांनी जयस्वाल यांच्याशी संपर्क साधला असता त्याने प्रत्येकी ३० हजाराची लाच मागितली. तडजोडीअंती प्रत्येकी १५ हजार या प्रमाणे ३० हजार देण्याचे ठरले. त्यानुसार लाच घेताना जायस्वाल याला रंगेहाथ अटक करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...