आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

इशारा:नोकरी देताना कोरोना काळातल्या पदव्यांना महत्त्व न देणाऱ्या कंपन्यांवर कारवाई केली जाईल, उदय सामंत यांचा इशारा

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • विद्यापीठांनी आखलेल्या नियोजनानुसार, अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी बिनधास्त परीक्षा द्यावी - सामंत

कोरोना संकटात परीक्षा देऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डिग्रीकडे कोणीही वेगळ्या किंवा नकारात्मक दृष्टीकोनातून पाहू नये असा इशारा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिला आहे. कोरोना संकटात परीक्षा देऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमी सारखीच डिग्री मिळणार आहे. त्यात कोणताही बदल करण्यात येणार नाहीत, असेही सामंत म्हणाले. ते 'एबीपी माझा'शी बोलत होते

दरम्यान उदय सामंत म्हणाले की, 'कोरोना संकटात परीक्षा देऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमी सारखीच डिग्री मिळणार आहे. त्यात कोणताही बदल केले जाणार नाहीत. त्यामुळे कोरोना संकटात डिग्री मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डिग्रीकडे कोणीही वेगळ्या किंवा नकारात्मक दृष्टीकोनातून पाहू नये.' तसेच 'जर कोणत्याही उद्योग समूहाने किंवा कंपनीने या विद्यार्थ्यांना नोकरी देताना ते कोरोना वर्षातील उत्तीर्ण असल्याने निवडीच्या प्रक्रियेत भेदाभेद केले, तर महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्या उद्योग, व्यवसायांवर कारवाई केली जाईल. त्यामुळे विविध विद्यापीठांनी आखलेल्या नियोजनानुसार, अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी बिनधास्त परीक्षा द्यावी.' असेही उदय सामंत म्हणाले.