आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नागपूर:महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल

नागपूर9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • निर्बंध असताना दोनशे लोकांच्या उपस्थितीतील कार्यक्रमास हजेरी

कठोर प्रशासक म्हणून प्रसिद्ध असलेले व नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याविरुद्ध नागपुरात पोलिस तक्रार दाखल झाली आहे. सभा संमेलनांना बंदी असताना दोनशे लोकांच्या उपस्थितीतील कार्यक्रमास हजेरी लावल्याबद्धल ही तक्रार दाखल करण्यात आली असून तक्रारीवर पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याने अद्याप कुठल्याही गुन्ह्याची नोंद झालेली नाही.

मनीष मेश्राम या नागरिकाने संबंधित कार्यक्रमाच्या व्हिडिअोसह गणेशपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या व्हिडिअोत मुंढे हे हॉटेल राजवाडा पॅलेस येथे मंचावर या कार्यक्रमास संबोधित करताना दिसत आहेत. ३१ मे २०२० रोजीचा हा व्हिडिअो असल्याचा दावा तक्रारकर्त्याने केला असून या कार्यक्रमास उपस्थित राहून मुंढे यांनी सध्याच्या निर्बंधांचे स्वतःच उल्लंघन केल्याचा दावा केला आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे सध्या सर्वच प्रकारच्या धार्मिक, सामाजिक, खासगी सभा, संमेलनांना पूर्णपणे बंदी आहे. मात्र, सुमारे दोनशे लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रमास उपस्थित राहत मार्गदर्शन करीत मुंढे यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ज्या अधिकाऱ्यांवर नागपूर शहरात संसर्ग रोखण्याची जबाबदारी आहे, तेच बेजबाबदारपणे वागत असल्याचे तक्रारीत नमूद आहे, अशी तक्रार आली असल्याचे स्पष्ट करताना तक्रारीची सहायक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडून चौकशी सुरू असल्याचे गणेशपेठ पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

बातम्या आणखी आहेत...