आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ:तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाचा उद्या समारोप, देशभरातील 735 स्वयंसेवकांसह 900 कार्यकर्ते सहभागी

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्गाचा समारोप उद्या गुरुवार 2 जून रोजी होणार आहे. रेशीमबाग येथील मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी भाग्यनगर येथील श्रीरामचंद्र मिशनचे अध्यक्ष दाजी उपाख्य कमलेशजी पटेल हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील.

याप्रसंगी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे देखील उद्बोधन होईल. यंदा दोन वर्षांच्या कालावधीनंतर 9 मे रोजी तृतीय वर्ष वर्गाचे आयोजन झाले. देशभरातील 735 स्वयंसेवक शिक्षार्थ्यांसह एकूण 900 कार्यकर्ता वर्गात उपस्थित आहेत. संघ शिक्षार्थ्यांना शारीरिक, बौद्धिक, सेवा यांच्यासह विविध विषयांबाबत प्रशिक्षण देण्यात आले.

2 जून रोजी सायंकाळी 6.30 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी शिक्षार्थी विविध कवायती, योगासने सादर करतील, अशी माहिती वर्गाचे सर्वाधिकारी अशोक पांडे व महानगर संघचालक राजेश लोया यांनी दिली आहे.

विविध व्यवसायी शिक्षार्थी

देशभरातील विविध प्रांतातून आलेल्या 735 शिक्षार्थी हे विविध व्यवसाय किंवा क्षेत्राशी जुळलेले आहेत. 163 शिक्षार्थी हे प्रचारक-विस्तारक आहेत. 57 शिक्षार्थी हे विद्यार्थी आहेत. याशिवाय नोकरदार (108), शिक्षक (103), शेतकरी (47), लघु व्यावसायिक (45), वकील (31), अभियंता (25), कामगार (23), प्राध्यापक (17), लघु उद्योजक (14), वैद्यकीय तज्ज्ञ (5) यांचादेखील प्रामुख्याने समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...