आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चपळगावकरांनी पिळले कान, साहित्य संमेलनाचा समारोप:साहित्याचा संसार उभा करण्यासाठी दरवेळी सरकारकडे हात का पसरता?

पीयूष नाशिककर| महात्मा गांधी साहित्य संमेलननगरी, वर्धा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्ध्यातील साहित्य संमेलनाचा खर्च अंदाजे तीन ते चार काेटी रुपये सांगण्यात येताे. त्यात सरकारने तीन दिवसांपूर्वीच दाेन काेटी रुपये दिले आहेत. हा खर्च डामडाैल बघून साहित्य संमेलन कमी खर्चात करायला हवा. साहित्याचा हा संसार उभा करायचा पैसा दरवेळी सरकारला का मागायचा? आपली परिस्थिती बऱ्यापैकी आहे, असे सांगत काही बाबींचा धागा धरत अत्यंत संयत शब्दांत साहित्य संमेलनाध्यक्ष माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी साहित्य महामंडळ पदाधिकाऱ्यांचे कान पिळले.

९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समाराेपीय अध्यक्षीय भाषणात रविवारी ते बाेलत हाेते. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही उपस्थिती होती. चपळगाकर म्हणाले, उदारता, मन जाणण्याची शक्ती जे साहित्य देतेउर्वरित. पान १०

आमच्याकडे दोन - चार लोक निर्णय घेतात : नितीन गडकरी
साहित्य संमेलन म्हटले की, त्याला काेणत्या ना काेणत्या वादाची किनार असते. वर्ध्यातील संमेलन मात्र काेणत्यही वादाविना झाले हे एक चांगले आहे. त्याचा खूप आनंद झाला आहे, असेही ते म्हणाले. आमच्याकडे हात वर करून मतदान होते, २ - ४ जण निर्णय घेतात तेव्हा लोकशाही व्यवस्थित चालते, असा टोलाही त्यांनी हसत हसतच लगावला. नाही ते काय कामाचे. मतभेद काहीही असले तरी एकमेकांचे विचार समजून घेतले पाहिजे. संमेलनातून माणसे एकमेकांचा जाेडली जातात. लेखक, वाचक यांच्यातील अडसर दूर करण्याचं ते एक माध्यम आहे. संमेलनात मनातील आवाज स्पष्ट उमटला जाताे. आवाज बुलंद हाेताे. दुसऱ्याच्या मताबद्दलची सहिष्णूता ही आपली परंपरा आहे. मत मांडण्याचा अधिकार आपल्या परंपरेने आपल्याला दिला आहे. हे लक्षात घेतले पाहिजे असेही चपळगावकर म्हणाले.

सुरक्षेबद्दल नेत्यांनीही बघावे... संमेलनाच्या अखेरच्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली हाेती. त्यांच्या भाषणावेळी चपळगावकर येत असताना फडणवीस यांच्यासाठी असलेल्या सुरक्षा यंत्रणेने त्यांना आत येऊच दिले नाही. यामुळे थाेडा गदाराेळ झाला. हाच धागा पकडून ते म्हणाले की, राजकीय नेत्यांनीही कार्यक्रमांना जाताना सुरक्षा यंत्रणेकडे जरा बघितले पाहिजे. पाेलिस बिचारे त्यांना सांगितलेले काम करत असतात. मात्र काही कारणाने वाद हाेता. पण त्यातून काहीतरी मार्ग काढता आला पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...