आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभेत झालेल्या चर्चेला उत्तर:मुुंबईतील रस्त्यांचे सहा हजार कोटी खर्चून काँक्रिटीकरण : एकनाथ शिंदे

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रस्त्यांचे काँक्रिटीकरण, पदपथ, रस्ते, उड्डाणपूल यांचे सुशोभीकरण आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण या सर्व कामांमुळे मुंबई बदलत आहे. मुंबईकरांच्या कल्याणासाठी आगामी काळात अशाच गतिमानपणे मुंबईचा कायापालट करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली. मुंबई मालमत्ताकर विधेयकावर विधानसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. मुंबईच्या विकासासाठी दिलेला शब्द आम्ही पाळला आहे. महानगरातील सर्व रस्त्यांचे ६००० कोटी रुपये खर्च करून काँक्रीटीकरण करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...