आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोर्टाचे आदेश:बाजार समिती निवडणुका 30 एप्रिलपूर्वी घ्या , राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाला दिले निर्देश

नागपूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभरातील प्रलंबित कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका ३० एप्रिलपूर्वी घेण्याचे आदेश नागपूर खंडपीठाने राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाला दिले. कृषी उत्पन्न बाजार समितीने निवडणुकीशी संबंधित मुद्द्यांवर नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यावर एकत्रित सुनावणी घेण्यात आली.

आदेशानुसार, काही बाजार समित्यांत प्रशासक किंवा प्रशासक मंडळ कार्यरत आहे. त्याला विविध कारणांनी विरोध होत आहे. त्यामुळे नेमण्यात आलेले प्रशासक, मंडळाच्या जागी सक्षम शासकीय अधिकाऱ्यांमार्फत नेमणूक करण्याचे स्वातंत्र्य राज्य शासनाला असेल.

...तरच प्रशासक बदल प्रशासकाबाबतचे आदेश वा शासनाने मुदतवाढ दिलेली असल्यास निर्णयाचे स्वातंत्र्य नव्या कार्यकारिणीस असेल. त्यामुळे नवनिर्वाचित कार्यकारिणी प्रशासक पुढे ठेवावा अथवा नाही याचा निर्णय घेईल. अर्थात, निवडून आलेल्या कार्यकारिणीवर गैरवर्तनाचे आरोप नसल्यास त्यांना नियमानुसार शासनातर्फे ही मुभा दिली जाईल.

बातम्या आणखी आहेत...