आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाई विरोधात काँग्रेस आक्रमक:नागपुरातील काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात; केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी

नागपूर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गगनाला भिडलेल्या महागाईच्या विरोधात काँग्रेसतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलना दरम्यान नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले. पोलिसांनी सांगूनही कार्यकर्ते ऐकत नसल्याने अखेर पोलिसांनी नेते व कार्यकर्त्यांना ताब्यात घेत गाडीत टाकले.

शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचाही प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळे पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले. आंदोलनात विशाल मुत्तेमवार, अतुल कोटेचा, उमाकांत अग्निहोत्री, प्रशांत धवड, संजय महाकाळकर, युवक काँग्रेसचे बंटी शेळके, संदेश सिंगलकर, कमलेश समर्थ, गिरीश पांडव, नैश अली, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

आमचे नेते राहुल गांधी शेतकऱ्यांचे, गरिबांचे प्रश्‍न घेऊन लढत आहेत. त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न भाजप सरकारकडून होत आहे. जीएसटी वाढवून जनतेला लुटायचे आणि चौकशीच्या नावाखाली आमच्या नेत्यांची बदनामी करायची, असा प्रकार सध्या सुरू आहे. राहुल गांधींनी आधीच सांगितले आहे की, काय करायचे आहे, ते करा. मी भीणार नाही केंद्र सरकार आम्हाला राष्ट्रपतींकडे जाऊ देत नाही, सभागृहात प्रश्‍न मांडू देत नाही. त्यामुळे आम्ही आंदोलन सुरू केले आहे. सरकारचा अन्याय थांबल्याशिवाय हे आंदोलन आता थांबणार नाही, असे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...