आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकीय:काँग्रेसमुळेच महाआघाडी सरकार आहे : नाना पटोले; पवारांची भलामण करणाऱ्या संजय राऊतांना सज्जड दम

नागपूर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूपीएच्या नेतृत्वाचा मुद्दा उपस्थित करून काँग्रेसला डिवचणारे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांच्यामुळे महाविकास आघाडीत वितुष्ट निर्माण होण्याची चिन्हे आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकार आमच्यामुळेच अस्तित्वात आले आहे, असा सज्जड दम काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊतांना दिला आहे.

शिवसेना हा संयुक्त पुरोगामी आघाडीचा (यूपीए) घटक पक्षही नाही, राऊत यांना यूपीएच्या नेतृत्वाबद्दल बोलण्याचा काही अधिकार नाही, असे खडे बोल सुनावले. पटोले विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते. यूपीएचे नेतृत्व शरद पवार यांनी करावे, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. त्यावर बोलताना पटोले म्हणाले, सोनिया गांधी नेतृत्व करण्यास सक्षम आहेत. राऊत यांनी यूपीएची चिंता करू नये. तसेच ते शिवसेनेचे खासदार वा प्रवक्ते राहिलेले नाहीत, ते आता पवार यांचे प्रवक्ते झाले आहेत, असा चिमटाही पटोले यांनी काढला. याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलू, असे ते म्हणाले.

फडणवीसांचा आरोप हा बालिशपणा
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशीची मागणी केली आहे. त्यातून सत्य बाहेर येईल, असे पटोले म्हणाले. रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असा अहवाल मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केला. मात्र हा अहवाल मंत्र्यांनी तयार केला हा फडणवीसांचा आरोप बालिशपणाचा आहे, असे सांगून शुक्ला यांची चौकशी सुरू झाली आहे. चौकशीत सत्य समोर येईल. महाराष्ट्रातील सत्ता गेल्यापासून भाजपचे राज्यातील नेते सैरभैर झाले आहेत. देवेंद्र फडणवीस हे बेछूट आणि बेलगाम आरोप करत असून सातत्याने खोटे बोलत आहेत. केंद्रीय तपासणी यंत्रणांना हाताशी धरून ते महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. वेळ पडली तर सरकारने फडणवीसांचीही चौकशी करावी, अशी मागणी पटोले यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...