आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर पूर्वीच कारवाई होण्याची अपेक्षा होती. त्यांच्यावर कारवाई करण्यात आमच्या सरकारला जरा विलंब झाला. त्यांच्यावर आधिक कडक कारवाई करण्याची गरज आहे, असे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं. तसेच शरद पवार यांच्या घरावर झालेल्या घटनेवर विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली. ही घटना निंदनीय असल्याचे ते म्हणाले. नागपुरात आपल्या निवासस्थानी ते माध्यमांशी बोलत होते.
कोर्टाच्या नावाने सदावर्ते यांनी भरमसाठ फी वसूल केली आहे. भडकाऊ भाषणे करून कर्मचाऱ्यांना आंदोलनासाठी उद्युक्त करण्याचा हा त्यांचा धंदा होता. ज्या भाषेमध्ये सदावर्ते कामगारांना भडकावत होते. त्यांची भाषा तोडगा काढून कामगारांना न्याय देण्याची नव्हती. तर ती भाषा कामगारांची माथी भडकावून त्यांना उद्ध्वस्त करणार होती, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
नागपूर कनेक्शन बोलणं उचित नाही -
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचा मोहरा जरी गुणरत्न सदावर्ते असले तरी याचा मास्ट्ररमाइंड मात्र नागपुरात असू शकतो, असे म्हटलं. यावर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर विजय वडेट्टीवार म्हणाले, की त्यावर, असे बोलणे उचित ठरणार नाही. हा तपासाचा भाग आहे. मी त्यावर भाष्य करणार नाही. या कटकरस्थानामागे कोण आहे याची चौकशी होईल. ते तपासात समोर येईल. या हल्ल्यामागे कोण आहे? हे कसे काय घडले? याची चौकशी गृहविभागाने केली पाहिजे. पोलिसांची गफलत झाली आहे. पोलिस चुकले आहेत. हे अचानक कसे घडले, याची पोलिसांना कल्पना कशी नाही, याबाबत तपासणी होईल. यामागे जो कोणी असेल त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे वडेट्टीवार यांनी म्हटलं.
मास्क वापरण्याचे आवाहन -
केंद्र सरकारकडून कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमुळे सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोरोना संपला असला तरी मास्क वापरावा आणि काळजी घ्यावी. सरकारने निर्बंध उठवले म्हणजे तुम्हाला मोकळीक दिली. पण, निष्काळजीपणा करू नका. कोरोनाचे व्हेरिएंट येत आहे. त्यामुळे या संकटात आपल्या आरोग्याची काळजी घ्या, असे आवाहन वडेट्टीवार यांनी नागरिकांना केले.
गुणरत्न सदावर्तेंना मुंबई पोलिसांकडून अटक -
एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावदेवी पोलिस ठाण्याने कलम 120 ब आणि 353 अंतर्गत कारवाई केली आहे. याशिवाय, शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी 105 एसटी कर्मचाऱ्यांवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी सर्व 105 आरोपींना अटक केली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.