आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन उड्डाण पुलाचे लोकार्पण:रस्ते व पुल बांधकामामुळे वर्धा जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल - केंद्रीय मंत्री नितिन गडकरी

वर्धा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वर्धा जिल्ह्यात कोरोना रुग्णावर उपचार करण्याकरिता मोठ्या प्रमाणात रेमडीसिवर औषधीची निर्मिती

जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण भागात कोट्यवधी रकमेची रस्ता व पुल बांधकामे झाली आहेत. यामुळे वर्धा जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाली असल्याचे प्रतिपादन केंद्रीय वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग विकास मंत्री नितिन गडकरी यांनी लोकार्पण दरम्यान केले.

नागपुर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग ७ वरील हिंगणघाट येथील नांदगांव चौरास्ता वरील ८५.२८ कोटी रकमेच्या उड्डाण पुलाचे लोकार्पण सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते. तत्पूर्वी गडकरी यांचे हस्ते महामार्गावरील शेडगाव चौरास्ता येथे ४७.७८ कोटी रकमेच्या प्रस्तावित उड्डाण पुलाचे भूमिपूजन केले. स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिवाजी मार्केट यार्डचे आवारात आयोजीत कार्यक्रमाला व्यासपीठावर खासदार रामदास तडस, खासदार डॉ विकास महात्मे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सरिता गाखरे,आमदार समीर कुणावार, आमदार पंकज भोयर, आमदार दादाराव केचे, आमदार रामदास आंबटकर, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रातार ,नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, हिंगणघाट बाजार समितीचे सभापती अँड सुधीर कोठारी, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ शिरीष गोडे यांची उपस्थितीत होती. पुढे बोलताना गडकरी म्हणाले की, वर्धा जिल्ह्याचे विकासाकरिता कोट्यवधिंचा निधी केंद्र शासनाकडून कडून देण्यात आला. यात शहरी भागासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रस्ता व पुलांची बांधकामे झाली. यामुळे वर्धा ज़िल्ह्याचे विकासाला गती मिळाली आहे. तसेच ग्रामीण भागातील जनतेला , शेतकरी वर्गाला सोई सुविधा प्राप्त झाल्याने शेती विकासाला सुद्धा गती प्राप्त झाली आहे.राष्ट्रीय महामार्गाच्या निर्मितीमुळे दुरचा प्रवास सुकर झाला आहे. वर्धा जिल्ह्यात अनेक कामाना मंजुरी देण्यात आली असून, सदर कामे निविदा स्तरावर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हिंगणघाट कृषी बाजार समितीच्या कार्याची प्रशंसा करुन बाजार समितीने सहकार्य केल्यास शेतकऱ्यांना शेतमाल ठेवन्याकरिता शीत गृहाचे बांधकाम करण्याकरीता सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन ना गडकरी यांनी सभापती सुधीर कोठारी यांना दिले. तसेच हिंगणघाट बाजार समितीने योगदान दिल्यास हिंगणघाट येथे अद्यावत रुग्णालयासह वैद्यकीय महाविद्यालय उभारणे शक्य आहे असे सांगून याकरिता सुद्धा सर्वपरी सहकार्य देण्याचे आश्वासन सुद्धा गडकरी यांनी दिले. वना नदीच्या खोलिकरण करणे गरजेचे असल्याचे कुणावार यांनी आपल्या भाषणातून सांगितले. यावर बोलताना ना गडकरी यांनी वना नदीच्या खोलिकरणाचे काम लवकरच सुरु करणार असल्याचे सांगून तशा सूचना त्यांनी जिल्हाधिकारी वर्धा व सबंधित अधिकाऱ्याना दिल्या.

वर्धा जिल्ह्यात कोरोना रुग्णावर उपचार करण्याकरिता मोठ्या प्रमाणात रेमडीसिवर औषधीची निर्मिती होत असल्याने जगात वर्धा जिल्ह्याचे नाव पोहचले असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच जिल्ह्यात मोठ्या संख्येने प्राणवायू प्रकल्पाची निर्मिती होत असल्याने कोरोनाच्या संभावित तिसऱ्या लाटेत रुग्णांना प्राणवायूची कमतरता भासणार नाही याची त्यांनी ग्वाही दिली. तसेच सरते शेवटी कोरोना नियमाचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.खासदार रामदास तडस व आमदार समीर कुणावार यांची भाषणे झाली. प्रास्ताविक नगराध्यक्ष प्रेम बसंतानी तर संचालन रेणूका देशकर यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...