आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सव:नागपुरातील वादग्रस्त पुरीचा गणपती अजूनही कुलूपबंदच

नागपूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

५० वर्षांपूर्वी पाचपावली परिसरातील सामाजिक कार्यकर्ते गुलाब पुरी यांनी वादग्रस्त देखाव्यातून सामाजिक संदेश देणारा गणपती प्रतिष्ठापित करण्याची परंपरा सुरू केली. हा गणपती गणेश चतुर्थीच्या दिवशी स्थापना न करता गणेशोत्सवा दरम्यानच्या कुठल्याही दिवशी स्थापन केला जातो. त्यांचे नातु शिवम पुरी यांनी या वर्षीही परंपरेप्रमाणे देखाव्यासह गणपती तयार केला. परंतु पोलिसांनी यावर्षी गणपती स्थापन होण्यापूर्वीच गणपती असलेल्या खोलीला कुलूप लावले.

नागपुरातील सर्व घरगुती आणि सार्वजनिक गणपतींचे विसर्जन शुक्रवार ९ सप्टेंबर रोजी झाले. परंतु पाचपावली पोलिसांनी कुलुप न काढल्यामुळे पुरीच्या गणपतीची पूजेची लहान व स्थापनेची मोठी अशा दोन्ही मूर्ती अजूनही कुलूपबंद आहे. आम्हाला रितसर विसर्जन करू द्यावे अशी मागणी पुरींनी पोलिस आयुक्तांना निवेदन देऊन केली आहे. उत्सवासाठी महापालिकेकडून रितसर परवानगी घेण्यात आली होती. स्थापनेपूर्वी दोन्ही मूर्ती नरेंद्र गुलाब पुरी यांच्या घरातील एका खोलीत ठेवण्यात येऊन मंडळ सदस्यांनी खोलीला कुलूप लावले. पण दहा दिवस होऊनही गणपतींचे विसर्जन झालेले नाही.

बातम्या आणखी आहेत...