आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • Controversial Puri's Ganapati Was Closed Before It Was Opened, Pachapavali Police Locked The Room As Soon As It Was Not Allowed To Be Installed.

जप्ती:वादग्रस्त पुरीचा गणपती खुला होण्याआधीच केला बंदिस्त, स्थापना करू न देताच पाचपावली पोलिसांनी खोलीला लावले कुलूप

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नागपुरातील गुलाब पुरी यांचा गणपती दरवर्षी स्थापन झाल्यानंतर मूर्ती व देखावे जप्त केले जातात. स्थापनेच्या निमित्ताने हाताळण्यात येणाऱ्या वादग्रस्त विषयांमुळे हा गणपती राज्यात प्रसिद्ध आहे. मात्र यावर्षी पाचपावली पोलिसांनी गणपती स्थापन होण्यापूर्वीच गणपती असलेल्या खोलीला कुलूप लावले आहे.

नागपूर शहरातील पाचपावली परिसरातील सामाजिक कार्यकर्ते गुलाब पुरी यांनी वादग्रस्त देखाव्यातून सामाजिक संदेश देणारा गणपती प्रतिष्ठापित करण्याची परंपरा ५० वर्षांपूर्वी सुरू केली. हा गणपती गणेश चतुर्थीच्या दिवशी स्थापना न करता गणेशोत्सवादरम्यान कुठल्याही दिवशी स्थापन केला जातो. त्यांचे नातु शिवम पुरी यांनी या वर्षीही परंपरेप्रमाणे देखाव्यासह गणपती तयार केला. परंतु पोलिसांनी यावर्षी गणपती स्थापन होण्यापूर्वीच गणपती असलेल्या खोलीलाच कुलूप लावले. पोलिसांच्या या दडपशाहीविरोधात शिवम पुरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरवर्षी गणपती स्थापन झाल्यानंतर मूर्ती व देखावे जप्त केले जातात. कोणत्याही परिस्थितीत आपण गणपतीची स्थापना करणारच असल्याचे शिवम पुरी यांनी सांगितले.

पूर्वी गुलाब पुरी यांनी गणपतीची स्‍थापना केली की, लगेच ती मूर्ती पोलिस जप्त करायचे. चंद्रशेखर आझाद गणेश मंडळाच्या वतीने पुरी हे गेल्या अनेक वर्षांपासून गणपतीची स्थापना करतात. त्यासोबत ज्वलंत सामाजिक समस्यांवर आधारित देखावेही असतात. १९९३ साली गुलाब पुरी यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचे चिरंजीव चंद्रशेखर, नरेंद्र यांनी ही परंपरा कायम ठेवली आहे. २००५ साली न्यायालयाने पुरींना गणपतीची प्रतिष्ठापना करू देण्याचे आदेश दिले होते.

२०१० साली पुरी यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या प्रतिमा उभारल्या होत्या. त्यामुळे त्यावेळी पोलिसांनी या प्रतिकृती जप्त केल्या होत्या. तर २०१९ मध्ये ‘प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख जमा होणार होते ते कुठे आहेत’, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारण्यात आला होता. २०२० मध्ये परवानगी नाकारली होती. २०२१ मध्ये काेरोना काळात गंगेत मोठ्या प्रमाणावर अर्धवट जळालेले मृतदेह फेकण्यात आले, कोरोना महामारीने जनता त्रस्त असतानाच पेट्रोल- डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसच्या दरवाढीने सामान्यांना जगणे कठीण झाले आहे. शेतकरी, व्यापारी व मजुरांना कोणी वाली राहिला नाही तर वैदर्भीय नेत्यांच्या मूग गिळून बसण्यावरही तिखट शेरेबाजी करण्यात आली होती. तर यावर्षी गणपती स्थापन होण्यापूर्वीच गणपती असलेल्या खोलीला पोलिसांनी कुलूप लावले आहे.

पोलिसांनी कुलूप लावून पुरीचा गणपती खोलीत बंदिस्त केला.

बातम्या आणखी आहेत...