आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
रमाकांत दाणी
कोरोनाच्या संसर्गावर प्रतिबंधात्मक आणि आजाराचा प्रभाव कमी करण्यासाठी आयुर्वेदातील औषधे कितपत प्रभावी ठरू शकतात याच्या प्रत्यक्ष क्लिनिकल ट्रायल प्रथमच घेतल्या जाणार आहेत. या चाचण्या सध्या कोरोनावर दिल्या जाणाऱ्या अॅलोपॅथी औषधांसह होणार आहेत. त्या यशस्वी ठरल्यास देशाच्या दृष्टीने खूप मोठी उपलब्धी ठरू शकेल. विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष आणि आयुष मंत्रालयाच्या आंतरविद्याशाखीय आयुष रिसर्च अँड डेव्हलपमेंट टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन म्हणाले, दोन्ही स्तरांवरील चाचण्या मुंबई, पुणे, लखनऊ, बनारस, चंदिगड, दिल्ली या शहरांतील शासकीय वैद्यकीय रुग्णालयांत होणार आहेत. त्यासाठीचा प्रोटोकॉल आयसीएमआरच्या मार्गदर्शनाखाली तयार केला आहे. बारा आठवडे चालणाऱ्या या चाचण्या जूनच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होतील.
काेरोनाग्रस्तांवरही होणार चाचण्या
: दुसऱ्या चाचण्या व्हेंटिलेटरवरील रुग्ण वगळता १४० कोरोना रुग्णांवर होतील. रुग्णांच्या एका गटाला अॅलोपॅथी, तर दुसऱ्या गटाला अॅलोपॅथीसह ज्येष्ठमध (अँटिव्हायरल), गुळवेल (प्रतिकारशक्ती) आणि पिपळी (औषधाचा परिणाम वाढवणारे गुणधर्म) तसेच आयुष-६४ या ३ औषधांचा वापर होईल.
प्रतिकारशक्ती वाढवण्याची होणार चाचणी
१२ आठवड्यांच्या चाचण्यांत आयुर्वेदिक औषधांच्या माध्यमातून कोरोनाविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढवता येते काय, याच्या सुदृढ व्यक्तींवर ट्रायल होणार आहेत.
1.
हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या उपयुक्ततेवर जगात एकमत नाही. अश्वगंधा हे औषध प्रतिकारशक्ती वाढवण्यात महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे ट्रायलमध्ये सहभागी व्यक्तींना या दोन्ही औषधांचे पर्याय देऊन चाचण्या पार पाडल्या जातील.
2.
व्यक्तींचा इम्युनॉलॉजिकल प्रोफाइलही घेऊन विशिष्ट कालावधीने त्यांची तपासणी केली जाईल. काही लोक पॉझिटिव्ह आल्यास हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन व अश्वगंधा घेणाऱ्या व्यक्तींमध्ये त्याचे प्रमाण किती याचे विश्लेषण केले जाणार आहे.
3. सुमारे ४०० व्यक्तींवर या चाचण्या घेण्याची परवानगी मिळाली असून रिझल्ट चांगले आल्यास अश्वगंधा हे औषध ग्लोबल ड्रग ठरू शकेल, असे मत डॉ. पटवर्धन यांनी व्यक्त केले.
हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन व अश्वगंधाचा वापर
दोन प्रकारे आणि दोन स्तरांवर स्वतंत्रपणे या चाचण्या जूनमध्ये सुरू होणार आहेत. कोरोनाचे रुग्ण नसलेल्या व्यक्तींवर कोरोनावर प्रतिबंधात्मक औषधी म्हणून हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन व अश्वगंधा या औषधांचा वापर केला जाणार आहे. त्यासाठी आघाडीवरील आरोग्य कर्मचाऱ्यांची निवड केली जात आहे.
ज्येष्ठमध, गुळवेल, पिपळीची मात्रा
दुसऱ्या चाचण्या प्रत्यक्ष कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर केल्या जाणार आहेत. त्यात कोरोनावर सध्या दिल्या जाणाऱ्या अॅलोपॅथिक औषधांसह रुग्णांना ‘अॅडऑन थेरपी’ म्हणून आयुर्वेदातील ज्येष्ठमध, गुळवेल, पिपळी व आयुष िवभागाने मलेरियासाठी विकसित केलेले आयुष-६४ ही औषधे दिली जाणार आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.