आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नागपूर:उपराजधानीत कोरोनाची रुग्णसंख्या 269 वर, मृताच्या थेट संपर्कात आलेले 60 जण निगेटिव्ह

नागपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अकोला हादरले, एकाच दिवसात 42 पॉझिटिव्ह

कोरोनाने शहरात शिरकाव केल्यापासून गुरुवार ७ मे घातवार ठरला. या दिवशी कोरोनाबाधितांचा आकडा आणखी ५९ ने वाढून २६५ झाला होता. शुक्रवारी त्यात चार रुग्णांची भर पडून २६९ ची नोंद करण्यात आली. दरम्यान, पार्वती नगरातील मृताच्या थेट संपर्कात आलेल्या ६० जणांचे नमुने निगेटीव्ह आल्यामुळे आरोग्य विभागाला मोठाच दिलासा मिळाला आहे. 

रुग्णांना  क्वारंटाईनकरीता ठेवण्यासाठी शहरातील १८ हाॅटेल्सनी पुढाकार घेतला होता. मात्र प्रशासनाकडून कोरोना रुग्णांना हाताळण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण न मिळाल्याने नागपूर रेडिटेन्टल हाॅटेल असोसिएशनने १७ हाॅटेलमधील विलगीकरण सुविधा बंद केली आहे. तसे पत्र िवभागीय आयुक्तांना देण्यात आले आहे. 

प्रशिक्षण केंद्र पोलिसांसाठी राखीव : नागपुरातील पोलिस कोरोना बाधित झाल्यास त्यांच्यासाठी राखीव िवलगीकरण कक्ष असावा म्हणून येथील पोलिस प्रशिक्षण केंद्राला पोलिस महासंचालक कार्यालयाने तातडीने िवलगीकरणाची मान्यता दिली. मात्र महापालिका प्रशासनाने अद्याप या बाबत अजून कोणताही निर्णय न घेतल्यामुळे शहर पोलिस दलातील १२ पोलिसांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. यात १ अधिकारी व ११ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. बुधवार ६ मे रोजी मरण पावलेल्या २२ वर्षीय युवकाचा अहवाल पाॅझिटिव्ह आला होता. त्याचे काका बेलतरोडी पोलिस ठाण्यात आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या या कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाईन ठेवण्यात आले आहे.

अकोला हादरले, एकाच दिवसात ४२ पाॅझिटिव्ह

अकोला | शहरात दिवसेंदिवस चिंताजनक परिस्थिती बनत असताना शुक्रवारी, ८ मे रोजी अकोला शहराला हादरा देणारा अहवाल समोर आला आहेत. दिवसभरात तब्बल ४२ जणांचे वैद्यकीय अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आले आहेत. यातील बहुतांश रुग्ण हे कोरोनाचा हाॅटस्पाॅट असलेल्या बैदपूरा भागातील असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. एकाच दिवशी अकोल्यातील  तब्बल ४२ जणांचे रिपोर्ट कोरोना पाॅझिटिव्ह आल्याने बाधितांचा आकडा वाढून १३७ वर पोहोचला आहे. दरम्यान, १ मे रोजी दाखल झालेल्या एका महिलेला उपचारादरम्यान शुक्रवारी मृत्यू झाला आहे. 

बातम्या आणखी आहेत...