आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाेरोना काळात नागपूर महानगर पालिकेच्या सहकार्याने उपराजधानीतील विविध दहन घाटावर २०२०-२१ या सरलेल्या आर्थिक वर्षात ५००० पेक्षा जास्त मृतदेहांचे संपूर्ण पर्यावरणपूरक पद्धतीने दहन करून सुमारे १० हजार झाडे वाचवल्याची माहिती पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराचे प्रणेते इको-प्रो फाउंडेशनचे अध्यक्ष विजय लिमये यांनी दिली. सुरुवातील फक्त नागपुरात सुरू केलेल्या पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराला राज्याबाहेरही चांगला प्रतिसाद मिळत असून, यामुळे वर्षाला सुमारे १८ हजार झाडांचा जीव वाचत असल्याची माहिती लिमयेंनी दिली. एका अंत्यसंस्कारासाठी १५ वर्ष वयाची दोन झाडे लागतात.
सध्या मोक्षकाष्ठ, गोकाष्ठ व गोवऱ्या रचून अंत्यसंस्कार केले जातात. म्हणजे रोज शंभर झाडांची कत्तल होत नाही. महिन्याला १,२०० आणि वर्षाला १४ हजार झाडे वाचतात. हे प्रमाण आणखी वाढवायचे असल्याचे लिमये यांनी सांगितले. या कार्यामुळे आम्ही, जवळपास दहा हजार स्वदेशी झाडांना जीवदान मिळवून दिले आहे याचे आम्हाला समाधान आहे, असे लिमये यांनी सांगितले. बीज लावल्यापासून झाडाची पूर्ण वाढ करण्यासाठी जवळपास २ हजार रुपये इतका खर्च येतो. हे लक्षात घेता एक कोटी रुपयांपेक्षा जास्तीची बचत या आर्थिक वर्षात केलेली आहे. पाच हजार मृतदेहांचा अग्निसंस्कार करण्यासाठी जवळपास १२५० टन इतका शेतकचरा “मोक्षकाष्ठ’ रूपात स्मशान घाटावर उपलब्ध करण्यात आला. या कृतीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतकचऱ्यातून जवळपास २० लाख रुपयांचा आर्थिक लाभ झाला आहे.
चंद्रपुरात कोरोना मृतदेहावर अंत्यसंस्कार
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रूग्णाच्या मृतदेहावर संबंधित रुग्णालयातर्फे थेट अंत्यसंस्कार केले जातात. प्लास्टिकमध्ये गुंडाळलेल्या मृतदेहावर डिझेल अथवा विद्युत शवदाहिनीत अंत्यसंस्कार केले जातात. पण, राज्यात चंद्रपूर येथे प्रथमच २०२० मध्ये कोरोनाने मरण पावलेल्या रुग्णावर पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार करण्यात आला. चंद्रपूर येथील अजय बहुउद्देशीय संस्थेने यासाठी पुढाकार घेतला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.