आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोना लस:खातरजमा करूनच कोरोना लसीला परवानगी देणार : आराेग्य मंत्रालय; 'दिव्य मराठी'ने दिले होते सर्वप्रथम वृत्त

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • डब्ल्यूएचओच्या आर्थिक संबंधांच्या चाैकशीची गरज
Advertisement
Advertisement

पूर्ण खातरजमा करूनच कोरोनावरील लसीच्या उपयोगाला मंजुरी देण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने डाॅ. इंद्रजित खांडेकर यांना दिली आहे. डाॅ. खांडेकर हे सेवाग्राम येथील वैद्यकीय महाविद्यालयातील न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख आहेत. “भारतीय जनतेसाठी कोरोना लस वा औषध मंजूर करण्यापूर्वी डब्ल्यूएचओवरील औषध कंपन्यांच्या प्रभावाची तपासणी करा’ ही बातमी “दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केली होती. या मागणीच्या समर्थनार्थ खांडेकर यांनी पंतप्रधान मोदींना ५१ पानी पत्र लिहिले होते. उपाय सुचवल्याबद्दल व सविस्तर अहवाल पाठवल्याबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने डॉ. खांडेकरांचे आभार मानले असून, लसीच्या सुरक्षिततेची योग्य काळजी घेऊन व नियमित नियमांचे पालन करूनच, सरकारद्वारे लसीला सार्वजनिक वापरासाठी परवानगी दिली जाईल, असे स्पष्ट केले आहे. भूतकाळातील २००९ च्या स्वाइन फ्लू साथीच्या अनुभवावरून काेरोना विषाणूचा प्रकोप आणि लसीच्या शिफारशींविषयी डब्ल्यूएचओच्या धोरणांवर लस उत्पादकांसह औषध कंपन्यांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून आला होता. आताही तिच शक्यता नाकारता येत नाही असेही मत डाॅ. खांडेकर यांनी अहवालात मांडले.

डब्ल्यूएचओच्या आर्थिक संबंधांच्या चाैकशीची गरज

भारतीयांसाठी कोरोनाची कोणतीही लस किंवा औषध मंजूर करण्यापूर्वी औषध कंपन्यांशी असलेल्या डब्ल्यूएचओच्या आर्थिक संबंधांची चौकशी करण्याची आवश्यकता आहे; असे मत डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या ५१ पानी सविस्तर अहवालात मांडले होते.

Advertisement
0