आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंडारा:कोरोना वॉरियर्स तरुणींना घरमालकाने घराबाहेर काढत सामान फेकले रस्त्यावर

भंडाराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नसल्याचा सहा तरुणींचा आरोप

कोविड वॉर्डात विविध पदांवर काम करत असलेल्या सहा तरुणी कोरोनावाहक असल्याचा आरोप करत घरमालकाने त्यांना घराबाहेर काढले. तसेच त्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की करून त्यांचे सामान रस्त्यावर फेकले. ही घटना भंडारा शहरात रविवारी घडली.

अकोला येथील सहा तरुणी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड वाॅर्डात कार्यरत आहेत. मागील दोन महिन्यांपासून तरुणी शहरातील पटेलपुरा वाॅर्डातील हिरणवार यांच्याकडे भाड्याने राहत होत्या. मात्र, कोविड वाॅर्डात काम करत असल्याने घरमालकांनी त्यांना, “तुम्ही कोविड वाॅर्डात रुग्णांसोबत राहता, वारंवार त्यांच्या संपर्कात येता,’ तुम्ही कोरोनावाहक असून तुमच्यामुळे कोरोना वाढू शकतो,’ असे सांगत त्यांना शिवीगाळ केली व धक्काबुक्की करत त्यांचे सामान रस्त्यावर फेकून घराबाहेर काढले. काही दिवसांपूर्वी घरमालकाने तरुणी ज्या खोलीत राहत होत्या तेथील पाणीपुरवठा, विद्युत पुरवठा बंद केला होता. घरमालकाचा मुलगा राहुल याने एका तरुणीला धक्काबुक्की करत तिच्यावर हात उचलल्याचा आरोप देखील तरुणींनी केला आहे. याप्रकरणी तरुणी पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेल्या असता पोलिसांनी त्यांची तक्रार नाेंदवून घेतली नसल्याचा आरोप तरुणींनी केला आहे.

तरुणींनी घरमालकाविरोधात तक्रार दिली नाही
त्या सहा तरुणी पोलिस स्टेशनमध्ये मला भेटल्या. मात्र, त्यांनी कुठल्याही प्रकारची तक्रार न देता घरमालकाला तंबी द्यावी, अशी विनवणी केली होती. मात्र, आता त्या माध्यमांसमोर जाऊन त्यांनी प्रकरणाला कलाटणी देण्याचा प्रयत्न करत आहेत. तरुणींनी तक्रार दिल्यास चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल. -लोकेश कानसे, पोलिस निरीक्षक, भंडारा

बातम्या आणखी आहेत...