आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअतूट प्रेमाचे प्रतिक असलेला सारस पक्षी अवैध शिकारीमुळे भारतातून नामशेष होण्याच्या मार्गावर होते. २००० साली भारतात सारस पक्ष्याच्या फक्त चार जोड्या शिल्लक राहिल्या होत्या. आज एकट्या गोंदिया जिल्ह्यात ३५ ते ३९ सारस पक्ष्यांचा सुखद वावर आहे. निसर्ग प्रेमी सावन बहेकर यांनी सारस पक्ष्याचे संवर्धन हे जीवन ध्येय केले. दरवर्षी ते पाहणी व निरीक्षण करतात. यावर्षी ११ जून रोजी मध्य प्रदेशातील बालाघाट व रविवार १२ जून रोजी गोंदीया व भंडारा जिल्ह्यात सारस गणना करण्यात आली. त्याची नेमकी आकडेवारी येत्या दोन ते तीन दिवसांत येईल, अशी माहिती सेवा संस्थेचे सावन बहेकर यांनी दिली.
गेल्या काही वर्षात गोंदिया येथील सेवा संस्थेमार्फत गोंदिया, बालाघाट या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनजागृतीचे काम झाले. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. यापूर्वी २०२० मध्ये महाराष्ट्रात ४४ तर बालाघाटमध्ये ५२ सारस पक्षी आढळून आले होते. या ४४ मध्ये ४२ गोंदीयात आणि ०२ भंडाऱ्यात आढळले होते. तर २०२१ मध्ये गोंदीयात ३५ ते ३९, भंडाऱ्यात ०२, आणि बालाघाटमध्ये ४८ सारस आढळून आले होते. पहाटे ५ ते १० या वेळेत पारंपरिक व शास्रीय अशा दोन्ही पद्धतीने गणना करण्यात आली. गणनेत पक्षीप्रेमी, शेतकरी व वनिवभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.
संपूर्ण वर्षभर सारस पक्षाचे निवासस्थान, प्रजननाची जागा तसेच भोजन प्रदेशाचे निरीक्षण करण्यात येते. त्यासाठी शेतकरी तसेच आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांना प्रशिक्षण दिले जाते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.