आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • Covid Situation Updates: Experts Say Having At Least One Close Person With The Corona Patient Will Help A Lot Intreatment; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना उपचारात मोलाचा सल्ला:एक्सपर्ट म्हणतात- कोरोना रुग्णासोबत किमान एक जवळची व्यक्ती असू द्या, उपचारात खूप मदत मिळेल

नागपूर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे चित्र नाशिक येथील झाकीर हुसैन रुग्णालयातील आहे. ऑक्सिजन गळती झाली त्यावेळी आपल्या माणसाला वाचवण्यासाठी शेवटचा प्रयत्न करणारे नातेवाइक. - Divya Marathi
हे चित्र नाशिक येथील झाकीर हुसैन रुग्णालयातील आहे. ऑक्सिजन गळती झाली त्यावेळी आपल्या माणसाला वाचवण्यासाठी शेवटचा प्रयत्न करणारे नातेवाइक.
  • अनेकदा गंभीर कोरोना रुग्ण तोंडावरील ऑक्सिजन मास्क काढून टाकतात
  • देखभालीच्या बाबतीत नातेवाइकाची डॉक्टर, नर्सशी तुलना होऊ शकत नाही

सध्या बर्‍याच रुग्णालयांत कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णाजवळ राहू दिल्या जात नाही किंवा त्यांना भेटू दिल्या जात नाही. असे करणे हे खूप क्रूर आणि अमानुष आहे. रुग्णांच्या जवळ नातेवाईकांची उपस्थिती तसेच नातेवाईकांची डॉक्टर, नर्सेस आणि त्यांच्या स्वतच्या रुग्णांशी नियमित संवाद हे उपचारांच्या मानकांचा एक अविभाज्य भाग असणे आवश्यक आहे, असे स्पष्ट मत सेवाग्राम वैद्यकीय महाविद्यालयातील न्यायवैद्यक तज्ज्ञ डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी व्यक्त केले आहे.

नातेवाईकांना भेटणे रुग्णांसाठी अत्यंत उपचारात्मक ठरू शकते आणि आयुष्यातील सर्वात कठीण परिस्थितीत टिकून राहण्याची इच्छा रूग्णाला देऊ शकते. परंतु कोविडमध्ये नातेवाईकांना रुग्णाजवळ राहू न देणे किंवा त्यांना भेटू न देणे हा रुग्णांवर व नातेवाईकानवर खूप मोठा आघात आहे, असे मत खांडेकर यांनी कोविड रुग्णांना उपचार करतांना त्यांना आलेल्या अनुभवातून संगितले. मी कोविड वार्डात दररोज जातो व तेव्हा मी बघितले आहे की, काही जास्त गंभीर नसलेले रुग्ण सुद्धा जगण्याची आशा कसे गमावतात आणि उपचारांना नकार का देतात, कारण एकटे संघर्ष करतांना ते थकून गेलले असतातच.

लघवी, शौचालय, खाणे, पिणे यासारख्या नित्यकर्मांची कामे करण्यात असमर्थ असणार्‍या रुग्णांजवळ मदत करण्यासाठी कोणताही नातेवाईक नसल्याने गोंधळ उडत असतो. तसेच काही रुग्ण वारंवार ऑक्सिजनचा मुखवटा काढून टाकतात, किंवा बेडवर किंवा बेडच्या बाजूलाचा लघवी करतात व त्यावरच झोपून राहतात. अशा सर्व रुग्णांना सतत मदतीची आवश्यकता असते. कोणत्याही रुग्णालयाच्या आरोग्य कर्मचार्‍यांने प्रत्येक रुग्णाची वैयक्तिक देखरेख करणे आणि सतत मदत देणे हे कधीच शक्य होणार नाही. अशी मदत फक्त नातेवाईक किंवा विशेष मदतनीसच करू शकतो. शिवाय, जर एखादा कोविड रुग्ण गंभीर नसताना सुद्धा भरती झाल्यानंतर आठवड्यांत मरण पावतो तेव्हा ते कुटुंबासाठी अत्यंत क्लेशकारक असते.

नातेवाईक रुग्णाजवळ उपलब्ध नसल्यामुळे त्यांना हेच कळत नाही की माझा चालता फिरता रुग्ण का दगावला व त्यांच्या या शंकेचे निराकरण करणे अशक्य असते. नातेवाईकांना अद्यापही शक्य तितक्या योग्य वेळी त्यांच्या रुग्णांना जीवंत असताना शेवटचे बघण्याची व योग्य प्रकारे निरोप घेण्याची संधी न देणे हे खूप निर्दयी आहे.त्यामुळे एका नातेवाईकाला मास्क घालून रुग्णाजवळ राहू देण्याची संमती द्यायला हवी, असं खांडेकर यांनी सांगितले

बातम्या आणखी आहेत...