आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोविन ॲप:एसएमएसऐवजी अपॉइंटमेंटचा पर्याय हवा, आयएमएचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सरकारी अनास्थेवर व्यक्त केली नाराजी

नागपूर / अतुल पेठकर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 31 हजार डॉक्टरांची नोंदणी, 8 ते 10 हजार जणांचे लसीकरण

महाराष्ट्रात आयएमएचे ४७ हजार सदस्य आहेत. त्यापैकी सुमारे ३१ हजार डॉक्टरांनी लसीकरणासाठी नोंदणी केली. प्रत्यक्षात केवळ आठ ते दहा हजार जणांचे लसीकरण झाले आहे. याला कारण आरोग्य खात्याचे नियोजन व आखणी नसणे हे आहे. एका केंद्रावर १०० जणांना लस टाेचली जाते. त्यात ५० खासगी डाॅक्टरांचा समावेश केल्यास लसीकरणाचा वेग वाढेल, अशी माहिती महाराष्ट्र आयएमचे अध्यक्ष डाॅ. अविनाश भोंडवे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

लसीकरणाचा वेग वाढवायचा असेल तर कोविन अॅपमध्ये एसएमएसऐवजी अपाॅइंटमेंटचा पर्याय दिला पाहिजे. म्हणजे एसएमएस आल्यावर तयारी नसेल, तर डाॅक्टर अपॉइंटमेंट घेऊन लस टोचून घेऊ शकतील. पण, सरकारी अधिकाऱ्यांची अनास्थाही याला कारणीभूत असल्याचे डाॅ. भोंडवे यांनी सांगितले. सरकार केवळ सरकारी डाॅक्टरांनांच निमंत्रित करत असल्यामुळे ५० टक्केही लसीकरण होऊ शकलेले नाही. अनेक ठिकाणी ३० ते ३५ टक्केच लसीकरण झालेले आहे. लोकांच्या मनात लसीकरणाविषयी शंका असल्यामुळे अपेक्षित उद्दिष्ट गाठू शकले नाही. लोकांमध्ये जागृती तसेच लसीकरणाविषयी अपेक्षित विश्वास निर्माण करण्यात आरोग्य खात्याला अपयश आले, असे डाॅ. भोंडवे यांनी स्पष्ट केले.

खासगी दवाखान्यात हवे लसीकरण
महाराष्ट्रात ९ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर लाॅकडाऊन जाहीर झाले. सरकारी यंत्रणा अपुरी असल्याने सरकारने खासगी दवाखाने ताब्यात घेतले. खासगी डाॅक्टरांनी कोरोनाच्या लढाईत पूर्ण सहकार्य केले. तद्वतच लसीकरणाचे उद्दिष्ट गाठायचे असेल तर खासगी रुग्णालयातही लसीकरण सुरू करावे. तिथे खासगी डाॅक्टरांसाठीच वेगळा कक्ष असावा. म्हणजे लसीकरणाचा वेग वाढेल. खासगी रुग्णालये आताही पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहेत. सरकारने पुढाकार घ्यावा, असे आवाहन डाॅ. भोंडवे यांनी केले.