आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवीन कायद्यानुसार आता जुनी त्रिसदस्यीय प्रभाग रचना रद्द करण्यात आली आहे. आगामी मनपा निवडणुकीसाठी एक किंवा दोन सदस्यीय प्रभाग रचना करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी केली आहे.
त्रिसदस्यीय प्रभाग रचना करू नये यासाठी बाळबुधे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहले आहे. तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीत गरीब उमेदवार निवडून येणार नाही. असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. नागपूर महानगरपालिका आयुक्तांमार्फत हे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे. अशी माहिती त्यांनी दिली आहे.
त्रिसदस्यीय प्रभाग मोठा
राज्यातील आगामी मनपा निवडणूक एक सदस्यीय पद्धतीद्वारे घेण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन ईश्वर बाळबुधे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. संविधानानुसार सर्वांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. मात्र जर त्रिसदस्यीय प्रभाग रचना असेल तर आर्थिकदृष्ट्या कमकुवत किंवा मागासवर्गीय नागरिक साठ हजार मतदारांच्या प्रभागात निवडणूक लढवू शकत नाही असे मत बाळबुधे यांनी व्यक्त केले. हा त्यांच्या अधिकारावर गदा आहे. त्यांच्यावर अन्याय आहे. निवडणुकीत 50 टक्के महिला लढणार आहेत. राजकीय आरक्षणानुसार त्रिसदस्यीय प्रभागात दोन मागासवर्गीय महिलांना निवडणूक लढवायची असेल तर त्यांना एका पुरुषावर अवलंबून राहावे लागत आहे. यामध्ये महिला पुरुषांचा समीकरण बसत नाही.
त्रिसदस्यीय प्रभाग रचनेत अंतर जास्त
त्रिसदस्यीय प्रभाग रचनेत नगरसेवक एका टोकाला असतो, तर नागरिक दुसऱ्या टोकाला यातून हेतुपरस्पर विकास कामांना ब्रेक लागतो. यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मनपात केवळ धनाढ्य लोकांनी प्रतिनिधी म्हणून येऊ नये. सर्वसामान्य नागरिक, मागासवर्गीय, महिला, सामाजिक कार्यकर्ते आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या लोकांना स्थानिक राजकारणात स्थान मिळायला हवे. आणि यासाठी एक सदस्य असलेली वार्ड रचना करावी अशी मागणी बाळबुधे यांनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.