आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा खंड प्रकाशित:भारतीय महिलांच्या कर्तृत्वाचा आढावा घेणाऱ्या सहा चरित्रकोशांची निर्मिती

अतुल पेठकर| नागपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संघमित्रा सेवा प्रतिष्ठान आणि सेविका प्रकाशनाच्या वतीने प्राचीन भारतात विविध क्षेत्रांमध्ये देदीप्यमान कर्तृत्व गाजवणाऱ्या भारतीय महिलांची माहिती देणारा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण सहा खंड प्रकाशित करण्यात येणार आहेत. यातील पहिला खंड प्रकाशित झाला असून त्यापैकी ५०० खंड िवक्री झाल्याची माहिती प्रकल्पाच्या कार्याध्यक्ष विद्या देवधर यांनी दिली. एका खंडाची किंमत १२०० रुपये आहे. सध्या चरित्रकोश हिंदी भाषेत असून त्याचे इंग्रजी भाषांतर सुरू आहे. दुसऱ्या भागात वेगवेगळ्या राण्या आणि संतांची माहिती राहील, असे देवधर यांनी सांगितले. या प्रकल्पाच्या कार्याध्यक्ष डॉ. विद्या देवधर यांच्या नेतृत्वात हे काम मागील पाच ते सहा वर्षांपासून सुरू आहे. ब्रह्मवादिनी गार्गी, वेदांच्या जाणकार विविध स्त्रिया, त्या काळातील शूर आणि कर्तृत्ववान राण्या, रसायन आणि इतर शास्त्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या शास्त्रज्ञ, तत्त्ववेत्त्या अशा अनेक महिलांबद्दल कोशात माहिती देण्यात येणार आहे.

४५० महिलांना स्थान देणारा पहिलाच ग्रंथ ६०० पानांचा आणि ४५० महिलांना स्थान देणारा मोठा कोश पहिल्यांदाच तयार करण्यात आला आहे. सर्व शैक्षणिक, सामाजिक संस्थांनी तो जवळ बाळगावा, असे मत प्रकल्पप्रमुख व प्रसिद्ध साहित्यिक डॉ. विद्या देवधर यांनी व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...