आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर:नागपुरात सिलिंडरच्या स्फोटाने झोपडपट्टीला लागलेल्या आगीत 100 झोपड्या खाक, सुमारे 20 सिलिंडरचा स्फोट

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराला लागून असलेल्या बेलतरोडी भागातील महाकालीनगर झोपडपट्टीला लागलेल्या आगीत सुमारे १०० झोपड्या जळून खाक झाल्या. नागपूरच्या रणरणत्या उन्हात सिलिंडर स्फोटाने लागलेली आग वेगाने पसरली. यात सुमारे २० सिलिंडरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. माहिती मिळताच पालकमंत्री नितीन राऊत व जिल्हाधिकारी विमला आर. यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली.

अग्निशमन दलाच्या दहा गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तासाभरानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. वस्तीच्या पूर्वेकडून आग लागली आणि एलपीजी सिलिंडर, वारा, उच्च तापमान आणि झोपडीच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारे लाकूड, बांबू, प्लास्टिकचे पत्रे, कापड इत्यादी ज्वलनशील साहित्याचा स्फोट झाल्यामुळे आग वेगाने पसरली. खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णवाहिकाही उपलब्ध ठेवण्यात आल्या होत्या. जड वाहनांसाठी योग्य रस्ता नसल्याने सुरुवातीला अडथळे आले.

पत्रकार, कॅमेरामनला धक्काबुक्की
या आगीचे वृत्तसंकलन करण्यासाठी गेलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या काही कॅमेरामन व प्रतिनिधींना काहींनी शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याची घटना घडली. झोपडपट्टीतील काही टारगट तरुण दारूच्या नशेत काहींच्या अंगावर धावून गेले. त्यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.

बातम्या आणखी आहेत...