आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर्शन:साईबाबांनी दिलेल्या नाण्यांचे दर्शन

नागपूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जवळपास १०५ वर्षापूर्वी श्रद्धा व सबुरीचे प्रतिक असलेल्या शिर्डीच्या साईबाबांनी स्वतः त्यांच्या सेवेत असलेल्या लक्ष्मीबाई (शिंदे) यांना समाधी घेण्यापूर्वी नऊ चांदीची नाणी दिली. या पावन नाण्याचे सर्व सामान्य साई भक्तांना दर्शन व्हावे या संकल्पनेतून लक्ष्मीबाई (शिंदे) यांचे पणतू अरुण गायकवाड हे श्री साई मंदिर भानेगाव (ता. सावनेर. जि. नागपूर) येथे १२ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ४.०० वाजता येत आहे. साईबाबांनी लक्ष्मीबाई (शिंदे) यांना दिलेल्या पावन नाण्याचे आवर्जून दर्शन घ्यावे असे आवाहन साई मंदिर व हनुमान मंदिर पंच कमिटी, भानेगाव यांनी केले आहे.

परभणी जिल्ह्यातील पाथरी गावात साईंच्या जन्म स्थळी एक मंदिर आहे. जुन्या घराचे अवशेष सांभाळून ठेवण्यात आले आहे. ट्रस्टद्वारे हे घर साईबाबांचे वंशज रघुनाथ भुसारी यांच्याकडून ३ हजार रुपयात ९० रुपयांच्या स्टॅम्पवर खरेदी करण्यात आले होते. या शिवाय त्यांची कफनी वगैरे शिर्डी येथे सांभाळून ठेवले आहे.

बातम्या आणखी आहेत...