आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ध्यातील साहित्य संमेलनात दत्ता मेघेंची प्रकृती बिघडली:थकव्याचे कारण, 15 मिनिटे स्तब्ध, वैद्यकीय उपचारानंतर भाषण केले

वर्धा साहित्य नगरी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

96 व्या साहित्य संमेलनाचे समारोप कार्यक्रम सुरु असतानाच माजी खासदार तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष दत्ता मेघे यांना कार्यक्रमस्थळी प्रकृती बिघडली. त्यांना अस्वस्थता जाणवल्यानंतर दुसऱ्या स्थळी नेत डाॅक्टरांनी प्रथमोपचार केले. त्यानंतर त्यांनी भाषणही केले.

96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे समारोप आज झाला. तत्पूर्वी समारोपाप्रसंगी स्वागताध्यक्ष दत्ता मेघे उपस्थित होते. काही वेळानंतर त्यांना अस्वस्थता जाणवू लागली. भाषण चालू असतानाच ते स्तब्ध झाले. हा प्रकार लक्षात येताच तीन चार नर्स व डाॅक्टरांना पाचारण करण्यात आले.

मेघे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना आचार्य विनोबा भावे सभामंडपाच्या स्टेजवरुन दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आले. तेथे दत्ता मेघे यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आला. यावेळी अभ्युदय मेघे ,डॉ सचिन पावडे व इतर डॉक्टर्स उपस्थित होते. अस्वस्थ झाल्यानंतर सुमारे पंधरा मिनिटे ते बोलू शकले नाही. उपचारानंतर मात्र त्यांना बरे वाटू लागले.

थकवा जाणवला

साहीत्य संमेलनाच्या आजच्या अखेरच्या समारोपाच्या दिवशी कार्यक्रमात मेघे थकले. दगदग झाल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला. अस्वस्थतेनंतर ते स्तब्ध बसले. व्यासपीठावर भाषण सुरू असताना हा प्रकार घडला. मात्र, उपचारानंतर त्यांना बरे वाटल्यानंतर त्यांनी स्वतः नंतर भाषणही केले.

बातम्या आणखी आहेत...