आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंडारा:वडिलांचे बोलणे असह्य झाल्याने जन्मदात्यावर उकळते तेल फेकून मुलगी फरार, लाखनी तालुक्यातील चिचगावची क्रूर घटना

भंडाराएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 25 वर्षीय मुलीने तीन वर्षांपूर्वी जवळच्या गावातील युवकासोबत केला होता प्रेमविवाह

वडिलांचे बोलणे असह्य झाल्याने मुलीने जन्मदात्याच्या अंगावर उकळते तेल टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना लाखनी तालुक्यातील चिचगाव येथे घडली. मनोज महादेव रामटेके (४७) असे जखमी जन्मदात्याचे नाव आहे. लाखनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चिचगाव येथील मनोज रामटेके याच्या २५ वर्षीय मुलीने तीन वर्षांपूर्वी जवळच्या गावातील युवकासोबत प्रेमविवाह केला होता. तेव्हापासून ती पतीसोबत त्याच्या गावी राहत होती. परंतु, घरगुती कारणावरून दोघांमध्ये वादविवाद निर्माण झाले. त्यामुळे एक वर्षापासून मुलगी माहेरी वडिलांकडे परत आली. दरम्यान, वडिलांचे मुलीसोबत भांडण झाले. यात त्याने “प्रेमविवाह केल्यानंतर पतीला का सोडले? तुझ्या वागणुकीत सुधारणा कर’ असे म्हटले. याबाबत मुलीने आपल्या मनात राग धरून ठेवला. रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास तिने वडील मनोज रामटेके याला जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या अंगावर कढईतील उकळते तेल टाकले. त्यामुळे त्याचे डोके, संपूर्ण चेहरा, मान, छातीचा भाग, पाठ व दोन्ही खांदे गंभीररीत्या भाजले. यानंतर मुलगी घरून पळून गेली. गंभीर जखमी झालेला मनोज तडफडत असल्याने मुलगा व पत्नी यांनी रुग्णवाहिकेद्वारे त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. या घटनेत तो ४० टक्के भाजला. भंडारा पोलिसांनी रुग्णालयातील वैद्यकीय अहवालावरून या घटनेची नोंद करून तपासासाठी प्रकरण लाखनी पोलिसांकडे पाठवले आहे. जन्मदात्याच्या अंगावर उकळते तेल ओतणारी क्रूर मुलगी घटनेच्या दिवसांपासून पसार असून, पोलिस निरीक्षक दामदेव मंडलवार ये तिचा शोध घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...