आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वन विभागाचा अंदाज:ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघाच्या चार बछड्यांचा मृत्यू

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रातील शिवणी वनपरिक्षेत्रात शनिवारी वाघाचे ४ बछडे मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. या चारही बछड्यांना नर वाघाने ठार मारल्याचा प्राथमिक अंदाज प्रकल्प संचालक जितेंद्र रामगावकर यांनी व्यक्त केला आहे. वनविभागाने दिलेल्या माहिती नुसार गुरुवार १ डिसेंबर रोजी कंपार्टमेंट क्रमांक २६५ मध्ये ३-४ महिने वयाची चार वाघांची पिल्ले दिसली. ३० नोव्हेंबर रोजी टी-७५ या वाघिणीचा कुजलेला मृतदेह याच परिसरात आढळला होता. तेव्हापासून आरएफओ शिवनी पीआरटी सदस्यांसह कर्मचारी शोध पथक या बछड्यांवर लक्ष ठेवून होते. शुक्रवार २ डिसेंबर २०२२ रोजी त्याच परिसरात एक नर वाघ आढळून आला होता. शनिवार ३ डिसेबर रोजी पथकाला वाघाच्या चारही पिल्लांचे (२ नर आणि २ मादी) मृतदेह आढळून आले. त्याच वेळी परिसरामध्ये नर वाघाचे अस्तित्व दिसले.

तर चारही मृतदेह चाव्याच्या जखमांसह सापडले असून ते नर वाघाने मारले असल्याचा संशय आहे. त्याच परिसरात २ नर आणि एका दुसऱ्या मादीची उपस्थिती असल्याने आईची ओळख पटलेली नाही. सर्व बछड्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर चंद्रपूर येथे नेण्यात येत आहे. सर्व बछडे आणि मृत वाघिणीच्या ऊतींचे नमुने डीएनए ओळख पद्धतीद्वारे विश्लेषित केले जातील. आणि आई आणि बछड्यांच्या ओळखीची पुष्टी केली जाईल, असेही सांगण्यात आले आहे.

ताडोबा- अंधारी प्रकल्पात वाघांची संख्या ८४ वर चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात एकूण ८६ वाघ होते. वर्षभरात दोन वाघांचा मृत्यू झाल्याने आता ८४ वाघांसह २५-३० बछडे या प्रकल्पात आहेत. विशेष म्हणजे, वाघाच्या हल्ल्यात गेल्या चार दिवसात ५ बछड्यांचा मृत्यू झाल्याने बछड्यांची संख्या कमी झाली आहे. मात्र बछड्यांचे वय २ वर्षे पूर्ण होईपर्यंत गणना केली जात नाही. नंतरच क्रमांक दिले जातात.

बातम्या आणखी आहेत...