आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सारस पक्ष्यांची संख्या घटली:सारस पक्ष्यांच्या संख्येत घट, गणनेत आढळले फक्त 37 पक्षी

नागपूर / गोंदिया16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

११ जून रोजी मध्य प्रदेशातील बालाघाट व रविवार १२ जून रोजी गोंदिया व भंडारा जिल्ह्यात सारस गणना करण्यात आली. त्याची आकडेवारी पक्षी प्रेमींची चिंता वाढवणारी आहे. या गणनेत गोंदिया जिल्ह्यांत ३४, भंडारा जिल्ह्यांत ३ व मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यांत ४५ सारस आढळून आले आहेत. २०२० च्या तुलनेत यंदा सारस पक्ष्यांची संख्या घटली आहे.

गेल्या काही वर्षात गोंदिया येथील सेवा संस्थेमार्फत गोंदिया, बालाघाट या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनजागृतीचे काम झाले. अलिकडे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर वन खातेही पुढाकार घेऊ लागले आहे. त्या नंतरही संख्या कमी होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. यापूर्वी २०२० मध्ये महाराष्ट्रात ४४ तर बालाघाटमध्ये ५२ सारस पक्षी आढळून आले होते. या ४४ मध्ये ४२ गोंदियात आणि २ भंडाऱ्यात आढळले होते. तर २०२१ मध्ये गोंदियात ३५ ते ३९, भंडाऱ्यात २, आणि बालाघाटमध्ये ४८ सारस आढळून आले होते. पहाटे ५ ते १० या वेळेत पारंपरिक व शास्रीय अशा दोन्ही पद्धतीने गणना करण्यात आली. गणनेत पक्षीप्रेमी, शेतकरी व वन विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.

पावसाळ्यात सेवा संस्था आणि वन विभाग सारस पक्ष्याच्या अधिवास असलेल्या ठिकाणी सारस पक्ष्यांची घरटे शोधण्यासाठी कठीण परिश्रम करतात आणि त्या घरट्यांतून सारस पक्ष्यांचे पिल्लू तयार होऊन उडण्यापर्यंत सारस पक्ष्याची काळजी घेतात. या भागातील २०२१ मध्ये गोंदिया जिल्ह्यातील ६ सारस आणि बालाघाट जिल्ह्यातील ४ सारसचे पिल्लू तयार होऊन नव्या जागेच्या शोधात निघाले आहेत. वर्षभर संस्थेचे सदस्य सारस पक्ष्याच्या आरामाची जागा, पुनरुत्पादन अधिवास आणि अन्नासाठी वापरल्या जाणाऱ्या भ्रमण मार्गाचा सराव करतात. तसेच सारसाच्या अधिवास असलेल्या ठिकाणी किंवा त्यांच्या सभोवताल राहणाऱ्या शेतकऱ्यांना सारस पक्ष्याचे महत्व पटवून देत सारस पक्ष्याच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी प्रवृत्त करतात. नागरिकांनीही काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

गोंदिया जिल्ह्यात एकूण ४२ गटांद्वारे ७० ठिकाणी गणना
१२ जून रोजी गोंदिया जिल्ह्यात एकूण ४२ गटांद्वारे ७० ठिकाणी गणना करण्यात आली. आकडेवारीची विश्वसनीयता आणि सारस पक्ष्यांची उपस्थिती यावर शंका नको म्हणून १३ ते १५ जूनपर्यंत सारस पक्ष्यांच्या अधिवास असलेल्या ठिकाणी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. ११ रोजी प्रकल्प प्रभारी अविजित परिहार यांच्या मार्गदर्शनाखाली बालाघाट जिल्ह्यातील ६० ठिकाणी २१ गटाद्वारे गणना करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...