आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलिदान:विमान दुर्घटनेत प्रवाशांचे जीव वाचवलेल्या दीपक साठेंची शौर्यगाथा, पुत्राच्या बलिदानावर वीरमातेची साश्रू भावना

नागपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी साठे यांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले. - Divya Marathi
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी साठे यांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले.
  • आज होता 83 वर्षीय आई नीला यांचा वाढदिवस

शुक्रवारी कोझिकोडमध्ये झालेल्या भीषण अपघातात आपल्या जिवाची पर्वा न करता प्रवाशांचे प्राण वाचावेत म्हणून अखेरच्या श्वासापर्यंत ज्यांनी प्रयत्न केला ते वैमानिक विंग कमांडर दीपक वसंत साठे यांच्या मातोश्री नीला साठेंना (८३) भावना अनावर झाल्या. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अनेक माध्यमांच्या प्रतिनिधींनी शनिवारी त्यांची भेट घेतली तेव्हा त्या म्हणाल्या, “आईला काही शब्द आहेत का आता बोलायला...आई काय बोलणार, सांगा तुम्ही? बस झालं...आणखी नाही बोलू शकणार...’, असे सांगताना या वीरमातेला हुंदका अनावर झाला. उपस्थित माध्यम प्रतिनिधींनाही गहिवरून आले. विशेष म्हणजे शनिवारी नीला यांचा वाढदिवस हाेता. अाईच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी रात्रीच मुलाच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी समजली. कोझीकोड दुर्घटनेत मरण पावलेले वैमानिक विंग कमांडर दीपक वसंत साठे यांचे आईवडील येथील वसंतनगरात राहतात. वडील वसंत साठे ८७ वर्षांचे आहेत.

नीला साठे मोठ्या धीराने बोलल्या. पण, वडिलांना बोलताच आले नाही. नीला साठे म्हणाल्या, त्याने एवढ्या लोकांचे प्राण वाचवले. पण, त्याचा स्वत:चा जीव गेला. परमेश्वरापुढे माथा टेकवण्यापलीकडे काही करू शकत नाही... एअरफोर्स, एनडीए सगळीकडे टाॅपर होता तो. आमचा मुलगा देशासाठी शहीद झाला. आमची दोन्ही मुले सैन्यात होती. साेर्ड आॅफ आॅनर मिळालेला पहिला महाराष्ट्रीयन अधिकारी होता तो. वायुदलाची आठही बक्षिसे त्याने मिळवली होती. सर्व क्रीडा प्रकारात प्रावीण्य मिळवले होते. मला काही बोलायला शब्दच नाहीत. देव तारी त्याला कोण मारी असे म्हणतात. पण, देवाने तारले कोणाला नि मारले कोणाला...बस झालं, आणखी पब्लिसिटी नकोच आहे आम्हाला. ठीक आहे, असे म्हणत त्या नि:शब्द झाल्या...मागच्या आठवड्यात आई-वडिलांचे दीपक यांच्याशी बोलणे झाले होते. वयस्कर लोकांना लवकर कोरोनाची बाधा होते, घराबाहेर पडू नका, असे दीपक यांनी बजावले होते. दीपक लहानपणापासून सर्वच क्षेत्रात टाॅपवर होते. एनडीए, घोडेसवारी, स्क्वाॅश, टेनिस बॅडमिंटन अगदी सगळ्या प्रकारांत ते पारंगत हाेते. सर्वच क्षेत्रात गोल्ड मेडल, टाॅपर. पण, काडीची घमेंड नव्हती. दीपक साठे यांचे वडील वसंत साठे निवृत्त कर्नल आहेत. तर मोठा भाऊ कारगिल युद्धात शहीद झाला.

बातम्या आणखी आहेत...