आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नागपूर:कार शेडला उशीर म्हणजे मुंबईकरांच्या खिशाला कात्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य

नागपूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'कार शेडसाठी संपादित जमीन वन विभागाची नाही'

आरे कार शेडची जागा वन विभागाला दिली तर हा प्रकल्प होत नाही. उर्वरित जागा दिली तर एक वेळेस विचार करता येईल. पण त्यात खूप अडचणी आहेत, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केले. कार शेडसाठी संपादित जमीन वन विभागाची नाही हे सर्वोच्च न्यायालयातही सिद्ध झाले. आरे कार शेडसाठी उच्च न्यायालय तसेच हरित लवादाने परवानगी दिली म्हणून काम सुरू झाले होते. कार शेड हटवणे योग्य नाही, असे फडणवीस म्हणाले.

आता नव्याने प्रक्रिया केली तर प्रकल्पाला उशीर होऊन किंमत वाढेल व त्याचे पैसे मुंबईच्या सर्वसामान्यांकडून तिकीट स्वरूपात वसूल केले जातील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पाचा डीपीआर अजून तयार नाही. मेट्रो ३ प्रोजेक्ट अडचणीत आणण्यात येत असून मुंबईकरांना वंचित ठेवण्याचे काम होत अाहे. पोलिसांच्या बदल्यांबाबतच डीजींनी सादर केलेला अहवाल पब्लिक झाला. यात काही लोक हस्तक्षेप करत होते. त्याची माहिती डीजींकडे होती. ती बाहेर आली तर सरकारची अडचण होईल, असा इशाराही फडणवीस यांनी दिला.