आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • Deputy Chief Minister Devendra Fadnavis' Big Statement In Shraddha Walker Murder Case, Will Investigate Why No Action Was Taken After Shraddha's Letter

..तर श्रद्धाचा जीव वाचला असता!:देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य, ते पत्र अत्यंत गंभीर, त्यावर कारवाई का झाली नाही, याचा तपास करू

नागपूर6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रद्धा वालकर हिने तिच्या जिवाला धोका असल्याचे पत्र 2020 मध्ये पोलिसांना लिहिले होते. त्यावेळी पोलिसांनी कारवाई केली असती तर कदाचित जीव वाचलाही असता असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे बोलताना केले.

श्रद्धा वालकर हिने आफताबकडून आपल्या जीवाला धोका असून तो माझ्या जीवाचे बरे वाईट करू शकतो असे पत्रात स्पष्टपणे नमुद केले होते. पण पोलिसांनी त्यावर काहीच कारवाई केली नाही, अशी माहिती समोर आली. त्यावर बोलताना फडणवीस यांनी कारवाई व्हायला हवी होती असे सांगितले.

पत्र अत्यंत गंभीर

फडणवीस म्हणाले, ते पत्र माझ्याकडे पण आले आहे. अत्यंत गंभीर पत्र आहे. पण त्यावर कारवाई का झाली नाही, याचा तपास करावा लागेल. त्या बद्दल कोणावरही दोषारोपण करू ईच्छित नाही. मात्र, अशा प्रकारच्या पत्रावर कारवाई न झाल्यास अशा प्रकारच्या घटना होतात. म्हणून या प्रकरणाचा तपास होईल.

फडणवीसांची ग्वाही

फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रातून एकही गाव कुठे जाणार नाही. उलट आम्ही सर्वोच्च न्यायालयात लढून बेळगाव, कारवार, निपाणीसह आमची गावे मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत.

पाणी देण्याचा निर्णय केला होता

फडणवीस म्हणाले, सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावांवर कर्नाटक सरकारने दावा सांगितला आहे. तीव्र पाणी टंचाईमुळे कर्नाटकात सहभागी होण्याचा ठराव या ४० गावांनी आता नाही तर या गावांनी 2012 मध्ये ठराव केला होता. आम्हाला पाणी मिळत नाही म्हणून या गावांनी तेव्हा असा ठराव केला होता. मी मुख्यमंत्री असताना कर्नाटकसोबत बोलणी केली होती. आणि जिथे पाणी उपलब्ध आहे. तिथून पाणी देण्याचा आपण निर्णय केला होता.

लवकरच योजनेला मान्यता

फडणवीस म्हणाले, म्हैसाळच्या सुधारित योजनेतही त्या गावांना घेण्याचा निर्णय तत्कालीन जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला होता. आता त्या योजनेला आपण लवकरच मान्यता देणार आहोत. होऊ शकते कोरोनामुळे अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकार या योजनेला मान्यता देऊ शकले नसेल. आता मात्र तिथे पाणी पोहोचणार आहे.

म्हणून कर्नाटक सीएम बोलले

फडणवीस म्हणाले, या सर्व योजनांना केंद्र सरकारचा पैसा मिळाला असून पैशाची कुठलीही अडचण नाही. आता कर्नाटकचे मुख्यमंत्री जे बोलले, ते समजून घेतले पाहिजे. सीमा वादाच्या प्रश्नावर आपल्या मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतल्यानंतर अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामुळे सीमा भागातील आपल्या लोकांना मदत करण्याचे आपण ठरवले आहे. त्यांच्यासाठी आधीच्या आणि काही नवीन योजना आपण पोहोचवत आहोत. त्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्री असे बोलले असतील.

बातम्या आणखी आहेत...