आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:तमाम विरोधाला न जुमानता संघाच्या कार्यक्रमाला आले होते प्रणवदा, काँग्रेसचा होता प्रचंड विरोध

अतुल पेठकर | नागपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
6 जून 2018 रोजी रेशिमबागस्थित मैदानावर आयोजित संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या समारोपीय कार्यक्रमाला मुखर्जी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते
  • तृतीय संघ शिक्षा वर्गाला दिलेली भेट देशभरात वादळ निर्माण करून गेली

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्ग तसेच दसरा उत्सवात देशोदेशीचे गणमान्य व्यक्ती प्रमुख पाहुणे म्हणून भेट देत आपले विचार मांडत असतात. पण, संघाच्या इतिहासात दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाला दिलेली भेट देशभरात वादळ निर्माण करून गेली. संपूर्ण हयात काँग्रेसमध्ये काढलेल्या मुखर्जी यांनी संघाच्या कार्यक्रमाला येऊ नये म्हणून प्रचंड विरोध झाला. परंतु त्याला न जुमानता प्रणव मुखर्जींनी संघाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. महाल येथील संघ संस्थापक डाॅ. हेडगेवार यांच्या निवासस्थानालाही त्यांनी भेट दिली.

६ जून २०१८ रोजी रेशिमबागस्थित मैदानावर आयोजित संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या समारोपीय कार्यक्रमाला मुखर्जी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नागपुरात वातावरण अतिशय तापले होते. त्यामुळे कार्यक्रमस्थळी कडेकोट बंदोबस्त होता.

“आज, मी येथे भारत, संदर्भ असलेल्या संदर्भात राष्ट्र, राष्ट्रवाद आणि देशभक्ती या संकल्पना समजून घेण्यास आलो आहे. या तीन संकल्पना इतक्या बारकाईने गुंफलेल्या आहेत की त्यापैकी कोणत्याही एकाकीकरणाविषयी चर्चा करणे कठीण आहे,’ अशी सुरुवात करत प्रणव मुखर्जींनी सर्वांची मने जिंकली होती.

राष्ट्र, राष्ट्रवाद आणि देशभक्ती या तीन शब्दांचा अर्थ आपण समजून घेऊया. राष्ट्राची व्याख्या ‘समान संस्कृती, भाषा किंवा इतिहास सामायिक असणाऱ्या लोकांचा एखाद्या विशिष्ट राज्यात वा प्रदेशात राहणारा एक मोठा गट’ म्हणून परिभाषित केली जाते. राष्ट्रवादाची व्याख्या ‘एखाद्याच्या स्वत:च्या राष्ट्राची ओळख आणि त्याच्या स्वारस्यांसाठी खास करून इतर राष्ट्रांच्या आवडीपासून दूर ठेवण्यासाठी केलेली समर्थन’ अशी व्याख्या केली जाते. देशभक्तीची व्याख्या ‘एखाद्याच्या देशाबद्दल भक्ती आणि जोमदार आधार’ म्हणून केली जाते. भारतीय राष्ट्रवाद वसुधैव कुटुंबकम आणि सर्वे भवन्तु सुखिनः। सर्वे सन्तु निरामयाः। यांच्या तत्त्वज्ञानापासून अस्तित्वात आला. आपण संपूर्ण जगाला एक कुटुंब म्हणून पाहतो आणि सर्वांच्या सुख आणि आरोग्यासाठी प्रार्थना करतो. आपली राष्ट्रीय ओळख सहअस्तित्त्वातून घडलेली आहे. सहअस्तित्वाची दीर्घकाळ प्रक्रिया, संस्कृती, श्रद्धा आणि भाषेतील बहुगुण विविधता यामुळे भारत विशेष बनतो. आम्ही सहनशक्तीपासून आपले सामर्थ्य प्राप्त करतो, असे विचार मुखर्जी यांनी व्यक्त केले होते.

अनेकदा येऊन गेले प्रणवदा

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी नागपुरात किमान तीन ते चार कार्यक्रमांसाठी येऊन गेले. २०१५ मध्ये नगर प्रशासनाच्या १५१ वर्षे पूर्णत्व सोहळ्यानिमित्त नागपूर महानगरपालिकेद्वारा विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजित कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून प्रणवदा होते. याशिवाय शरद पवार कृषिमंत्री असताना केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत आयोजित राष्ट्रीय कृषी मेळाव्यास आले होते.

संघाला कोणी परका नाही, म्हणाले होते मोहनजी

संघकार्य जवळून पाहण्यासाठी वेगवेगळ्या विचारांचे महापुरुष तसेच वेगवेगळ्या राजकीय विचारसरणीचे कार्यकर्ते व नेते येतात. संघाचा तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्ग दरवर्षीच होतो. तसा तो याही वर्षी झाला. संघाच्या कार्यक्रमात वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांनी येणेही नवीन नाही. पण यावर्षी याची खूप चर्चा झाली, असे भागवत म्हणाले.