आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज संमेलनाध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांनाच संमेलनात येण्यापासून पोलिसांनी रोखल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
पोलिसांनी वाहन रोखताच नरेंद्र चपळगावकर यांची मुलगी भक्ती चपळगावकर यांनी आम्ही मारेकरी दिसतो का?, अशा शब्दांत पोलिसांना सुनावले. त्यानंतर पोलिसांनी संमेलनाध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांच्या वाहनाची वाट सोडली.
नेमके काय घडले?
96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप होत आहे. त्यानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत समारोप शुभारंभ कार्यक्रम होत असतानाच संमेलनाचे अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर हे साहित्य नगरीत येत होते. मात्र, पोलिसांनी प्रवेशद्वारावरच त्यांचे चारचाकी वाहन अडवले.
नरेंद्र चपळगावकर यांच्यासोबत त्यांचे कुटुंबही वाहनात होते. प्रवेशद्वारावरच वाहनाची पोलिस विभागाकडून अडवणूक करण्यात आली. यावर नरेंद्र चपळगावकर यांची मुलगी भक्ती चपळगावकर यांनी वाहनाच्या खाली उतरून आम्ही का मारेकरी दिसतो? असा आवाज उठवला. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या वाहनाची वाट सोडली. त्यानंतर नरेंद्र चपळगावकर व कुटुंबीय संमेलनस्थळी पोहोचले. मात्र, त्या ठिकाणी गेल्यानंतरही नरेंद्र चपळगावकर यांना कुठल्याही प्रकारचा मान देण्यात आला नसल्याचे दिसून आले.
आम्हाला प्रवेश द्या, आम्ही साहित्यिक आहोत
घडलेल्या घटनेबद्दल भक्ती चपळगावकर यांनी सांगितले की, माझे बाबा आणि माझे कुटुंब वाहनातून संमेलन स्थळी येत असताना प्रवेशद्वारावर अडवणूक करण्यात आली. मी पोलिसांवर ओरडले. त्यानंतर आम्हाला सोडले. आयोजकांनी पासेस देणे गरजेचे होते.
व्हीआयपींच्या सुरक्षेचा अतिरेक:अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सर्वसामान्य रसिकांना झाला मनस्ताप
साहित्य नगरीतील आचार्य विनोबा भावे सभामंडपात संमेलनाचा समारोप शुभारंभ कार्यक्रम हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यसभा खासदार अनिल बोंडे, खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर,आमदार समीर कुणावार, आमदार समीर मेघे, सागर मेघे,अभ्युदय मेघे यांच्या उपस्थितीत झाला.
संबंधीत वृत्त
चपळगावकरांनी साहित्य संमेलनात सुनावले खडेबोल:साहित्याचा संसार सरकारी नियंत्रणात न जाण्याचे भान साहित्यिकांनी राखावे
सरकारने साहित्य संमेलन भरवणे ही कल्पना कोणत्याही स्वतंत्र देशाला आणि स्वतंत्र समाजाला मानवणारी नाही. सरकारी साहित्य संमेलनांमुळे यथावकाश साहित्याचे सरकारीकरण होऊ शकते, असे खडेबोल सुनावतानाच साहित्याचा संसार गरिबीत राहिला तरी चालेल, पण तो सरकारच्या नियंत्रणात जाऊ नये, याचे भान साहित्य संस्था आणि साहित्यिकांनी राखले पाहिजे, अशी रोखठोक भूमिका 96 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी मांडली. वाचा सविस्तर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.