आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासाहित्य निर्मितीत राजकारण्यांचेही मोठे योगदान आहे. राजकारणी साहित्य निर्मितीची प्रेरणा आहे. आम्ही नसतो तर अनेकांना व्यंगचित्र काेणाचे काढावे असा प्रश्न पडला असता. आमच्यातही यमक जुळवणारे, स्क्रिप्ट लिहिणारे आणि शीघ्र कवी आहे. सकाळी तुम्ही टीव्ही लावलात की आमची प्रतिभा ओसंडून वाहाते असे फडणवीसांनी सांगताच सभागृहात खसखस पिकली. थोडीशी जागा मिळाल्यावर संपूर्ण जागा कशी व्यापून टाकायची हे आम्हाला चांगले जमते असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. नव्या पिढीचा भाषेकडचा कल कमी होण्यामागे आपण मराठीला ज्ञानभाषा करू शकलो हे आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने आखलेल्या नव्या शैक्षणिक धोरणांत प्रादेशिक भाषेतून शिक्षण देण्यावर भर देण्यात आला आहे. यामुळे या पुढील सर्व शिक्षण मराठीतून देण्यात येईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला.
वर्धा येथे आयोजित संमेलनात आयोजित "गांधीजी ते विनोबा' या परिसंवादा दरम्यान उपमुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार रामदास तडस व अनिल बोंडे, आमदार समीर कुणावार व पंकज भोयर, आमदार समीर मेघे आदी उपस्थित होते. यावेळी विदर्भ साहित्य संघाला शताब्दी वर्षानिमित्त उपमुख्यमंत्र्यांनी 10 कोटींचा निधी देण्याचे जाहीर केले.
ज्ञानाधारित अभ्यासक्रम इंग्रजीत असल्यामुळे मराठी भाषा माघारली. नव्या शैक्षणिक धोरणांत सर्व शिक्षण मराठीतून देऊ शकणार आहोत. पिपरी मेघे येथील दत्ता मेघे इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायंसेसमध्ये वैद्यकीय शिक्षण मराठीतून देण्याच्या अभ्यासक्रमाचे विमोचन केले. त्यामुळे यापुढे माय मराठीतून संपूर्ण अभ्यासक्रमाचे शिक्षण देणे शक्य होईल असे फडणवीस यांनी सांगितले.
नवमाध्यमातून अलिकडे मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती होते. पण, हा नवमाध्यमांचा संक्रमणाचा काळ असल्यामुळे या साहित्यात मूळ साहित्याची उंची व खोली नाही. दर्जेदार साहित्य निर्मिती अभिजात साहित्यातून होते. अलिकडे मोठ्या संख्येने नवनवीन साहित्य निर्मिती होते. त्यामुळे मूळ साहित्य समृद्ध होते, असे ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.