आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुनी पेन्शन योजना शासन देणार नाही:दिल्यास राज्य दिवाळखोरीत निघेल; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जुनी पेन्शन योजना शासन देणार नाही. कारण दिल्यास राज्य दिवाळखोरीत निघेल असे प्रश्नोत्तराच्या तासात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. जूनी पेन्शन योजना दिल्यास राज्यावर 1 लाख 10 हजार कोटींचा बोजा पडेल व राज्य दिवाळखोरीत निघेल. त्यामुळे शासन जूनी पेन्शन देणार नाही असे फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.

विनाअनुदानीत तसेच अंशत

अनुदानीत शाळांना अनुदान कधी देणार असा प्रश्न संजय शिंदे, सुनील शेळके, मंगेश चव्हाण, नाना पटोले, दीपक चव्हाण आदींनी उपस्थित केला होता. त्यावर प्रारंभी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उत्तर दिल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत यापुढे विनाअनुदानीत शाळा देणार नाही अशी घोषणा केली. 2010 मध्ये आपण 20% ऐवजी 40 % अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी घोषीत, अघोषीत आणि त्रूटी पुर्तता करूनही फक्त 350 शाळा होत्या. आणि आता अनुदान देता देता शाळांची संख्या 3 हजार 900 इतक्या झाल्या. या शाळांना अनुदान देतो म्हटले तरी पुढील 3 वर्षात 5 हजार काेटींचा बोजा पडेल असे फडणवीस यांनी सांगितले. आम्ही छातीला माती लावून 350 शाळांना एकदाचे अनुदान दिले. पण यापुढे देता येणार नाही असे फडणवीसांनी स्पष्टपणे सांगितले.

"भीक' मागता येईल काय...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापुढे फक्त स्वयंअर्थसहायीत शाळांनाच परवानगी देता येईल असे जाहीर केले. त्यावर बोलताना छगन भुजबळ यांनी शाळांसाठी "भीक' मागून निधी जमवला तर परवानगी द्याल काय?, असा खोचक प्रश्न विचारला. त्यावर सभागृहात खसखस पिकली. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यावर उत्तर देताना प्रबाेधनकार ठाकरे यांच्या "माझी जीवनगाथा' या पुस्तकातील उतारा वाचून दाखवला.

बातम्या आणखी आहेत...