आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अक्ष्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्याला पक्षातून तीव्र विरोध होत आहे. मात्र, शरद पवार यांच्या राजीनाम्यावर आत्ताच बोलणार नाही. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
शरद पवारांनी राजकीय निवृत्तीची घोषणा करताच महाराष्ट्रात तीव्र राजकीय घडामोडी घडत आहेत. सध्या अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, रोहित पवार, सुभाष देसाई, अनिल देसाई पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल झालेत.
काय म्हणाले फडणवीस?
शरद पवार यांनी त्यांच्या लोक माझा सांगाती या आत्मचरित्राच्या प्रकाशनप्रसंगी राजकीय निवृत्तीची घोषणा केली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, शरद पवार यांचा राजीनामा हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. तो राष्ट्रवादी काँग्रेसमधला अंतर्गत प्रश्न आहे. त्यावर आत्ताच बोलणे खूप प्री मॉच्यूअर होईल.
पुस्तक वाचले नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. या प्रकरणी दोन दिवसांनी बोलू. त्यासाठी आम्हाला वाट पाहावी लागेल. काय होत आहे, का होत आहे. हे सगळे ठरू द्या. नंतर त्यावर बोलेन. मी शरद पवारांचे पुस्तक वाचलेले नाही. त्यामुळे त्यावर आत्ता बोलणार नाही. मात्र, मलाही पुस्तक लिहायचे आहे. योग्यवेळी लिहिणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
निवृत्तीवर ठाम
'लोक माझे सांगाती'चे पुस्तक प्रकाशन झाल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना शरद पवार म्हणाले, कुठे थांबायच हे मला कळत. गेली सहा दशके राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर काम केल्यानंतर मी आता निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे काही जणांना अस्वस्थ वाटेल. मात्र, मी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळीच पवारांना निर्णय मागे घेण्यासाठी साकडे घातले. मात्र, त्यांनी आपण निर्णयावर ठाम असल्याचे सांगितले.
संबंधित वृत्तः
लोक माझे सांगाती:अजितचा पहाटेचा शपथविधी माझ्या सहमतीविना; शरद पवारांनी पुस्तकातून सोडले मौन
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.