आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोला:शरद पवार आणि नैतिकतेचा काय संबंध, एकदा इतिहासात डोकावून पाहा, वसंतदादांचे सरकार कसे गेले? - देवेंद्र फडणवीस

नागपूर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शरद पवार आणि नैतिकतेचा काय संबंध आहे? असा सवाल करतानाच शरद पवारांनी भाजपाला नैतिकता शिकवायचे ठरवले तर कठीण होईल अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना केली.

शरद पवार भाजपला नैतिकता शिकवित असतील इतिहासात जावे लागेल. वसंतदादांचे सरकार कसे गेले, इथपासून सुरुवात होईल. पवार ज्येष्ठ नेते आहेत. ते सतत बोलत असतात. त्यांच्या बोलण्याकडे फारसे लक्ष द्यायचे नसते असा टोला फडणवीसांनी लगावला.

कुठल्या नाकाने नैतिकतेच्या गोष्टी सांगतात?

उद्धव ठाकरे यांना नैतिकतेच्या गोष्टी करण्याचा काहीही अधिकार नाही. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावून मते घेतली. आणि मुख्यमंत्रीपदाच्या खूर्ची करीता विचार, युती आणि पक्षही सोडला. नंतर हिंदुत्वाचा विचारही सोडला. ते कुठल्या नाकाने नैतिकतेच्या गोष्टी सांगतात असा सवाल फडणवीस यांनी केला.

तर हे गंभीर...

सर्वोच्च न्यायालयाने सत्ता संघर्षाच्या निकालातील सर्वाधिकार हे विधानसभा अध्यक्षांना दिलेले आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर विधानसभा अध्यक्षांवरती कोणी दबाव आणत असेल तर हे गंभीर आहे. पण महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष हे निष्णात वकील आहेत. त्यामुळे ते विरोधकांच्या अशा कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही.

योग्य निर्णय घेतील

विधानसभेचे अध्यक्ष योग्य ते निर्णय घेतील. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आला असेल तर त्यांनी ढोल बडवावे असा टोला फडणवीस यांनी हाणला.

संबंधित वृत्त

अटलबिहारी वाजपेयींची उंची मोठी:नैतिकतेच्या मुद्दयावर शिंदे-फडणवीस राजीनामा देतील असे स्वप्न देखील पाहू नका : अजित पवार

अटलबिहारी वाजपेयी आणि आत्ताच्या सत्ताधाऱ्यांची उंची यात जमीन-आस्मानचा फरक आहे. नैतिकतेच्या मुद्दयावर शिंदे-फडणवीस सरकार राजीनामा देतील असा विचार कुणी मनात सुद्धा आणू नका. ते प्रत्यक्षात काय स्वप्नात पण राजीनामा देणार नाहीत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी शिवसेना-भाजप सरकारला लगावला आहे. वाचा सविस्तर