आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उरलेली शिल्लकसेना:फडणवीसांचा ठाकरेंना टोला; म्हणाले, उद्धव सत्ता गेल्याच्या नैराश्यातून बोलत आहेत

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सत्ता गेल्यामुळे आलेल्या नैराश्यातून उद्धव ठाकरे बोलत आहेत. अशा निराश लोकांवर फार प्रतिक्रिया देणे योग्य नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात बोलताना केली. यामुळे भविष्यात शिंदे-फडणवीस सरकार विराेधात उद्धव ठाकरे यांची शिवसेना असा सामना रंगत जाणार हे स्पष्ट झाले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार विराेधात उद्धव ठाकरे यांनी दंड थोपटले आहे. शिवसेनेला जमिनीवर आणा, असा संदेेश शहा यांनी कार्यकर्त्यांना दिला. त्यावर शिवसेनेला जमीन दाखवण्याची भाषा करणाऱ्यांना योग्य वेळी उत्तर देऊ, असे सांगत भाजपाला सडेतोड उत्तर देणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

ठाकरेंना महत्त्व देत नाही

दसरा मेळावा शिवतीर्थावरच होईल. मेळाव्यात आम्हाला जमीन दाखवणाऱ्यांना जमीन दाखवू असे ठाकरे म्हणाले होते. त्यावर नागपुरात बोलताना फडणवीस यांनी निराश लोकांबद्दल काय बोलायचे असे म्हणत ठाकरे यांना महत्व देत नसल्याचे दाखवून दिले.

या संदर्भात बोलणे योग्य नाही

राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सध्या सुनावणी आहे. आणि सुनावणी होत असताना त्या संदर्भात बोलणे अनुचित आहे. सुनावणी चालेल. आम्ही आमची बाजू मांडू. समोरचे लोक त्यांची बाजू मांडतील. पण कोर्टात सुनावणी असताना त्या संदर्भात बोलणे योग्य होणार नाही. असे फडणवीस यांनी सांगितले.

उरलेली शिल्लकसेना

फडणवीस यावेळी म्हणाले, राजकीय हेतूने काढलेला हा दौरा नाही. राजीव उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त मानवंदना द्यायला आलो आहे. आमचे मिशन महाराष्ट्र आहे. त्याच अंतर्गत बारामती आहे. कल्याण-डोंबिवली जागेबाबत बोलताना ते म्हणाले, आमच्यासोबत ओरिजनल शिवसेना आहे. उरलेली शिल्लकसेना आहे. त्यातल कोणी असेल तर त्याबाबत मी आणि शिंदे साहेब मिळून ठरवू. असेही ते म्हणाले.

प्रेरणादायी आणि गर्वाचा क्षण

सरकारने कुठलेही मैदान ब्लॉक केलेले नाही. या बाबतीत सर्व काही नियमाने होईल. नियमात असेल त्यांना मैदाने मिळतील असे त्यांनी स्पष्ट केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा मॉस्कोमध्ये लावला जात आहे. हा आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आणि गर्वाचा क्षण आहे असेही फडणवीस म्हणाले.

गणेशोत्सव मंडळांना भेटी

बजाज नगर युवक गणेश उत्सव मंडळ, लक्ष्मीनगर गणेश उत्सव मंडळ, अभ्यंकर नगर सार्वजनिक बाल गणेश उत्सव मंडळ, माधवनगर गणेश उत्सव मंडळ, प्रतापनगर येथील बालगणेश उत्सव मंडळ आणि साहस गणेशोत्सव मंडळ येथील गणेशाची उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. याशिवाय छत्रपती गणेशोत्सव सांस्कृतिक व क्रीडा मंडळ छत्रपती नगर, हनुमान सेवा समिती सावित्री विहार, न्यू मनीष नगर का राजा गणेश उत्सव मंडळ, जयप्रकाश नगर गणेश उत्सव मंडळ यांसह इतरही गणेश मंडळांचेही दर्शन घेतले.

ठाकरेंचा पलटवार

शिवसेनेला जमीन दाखवायची आहे, असे वक्तव्य मुंबई दौऱ्यात शहांनी केले होते. याला उद्धव ठाकरेंनीही प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, त्यांना काय बोलायचे ते बोलू देत, पण आपण भाजपला पालिका निवडणुकीत अस्मान दाखवू असा पलटवार उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केला. मुंबई दौऱ्यावर असताना अमित शहा यांनी सोमवारी उद्धव ठाकरेंवर कठोर शब्दांमध्ये टीका करताना 'त्यांना जमीन दाखवण्याची वेळ आली आहे', असे वक्तव्य केले होते.

बातम्या आणखी आहेत...