आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडतूस नाही मी काडतूस!:उद्धव ठाकरेंना विचारतो, काय होतास तू काय झालास तू, कसा वाया गेलास तू? झुकेंगा नही घुसेंगा साला - फडणवीस

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

''उद्धव ठाकरे म्हणतात की, माझ्या वडीलांचे नाव पळवले. मी म्हणतो त्यांचे विचार कुठे गेले. वारसा जन्माने नव्हे कर्माने मिळतो. सावरकरांना रोज शिव्या दिल्या जातात पण उद्धव ठाकरे व त्यांचा मुलगा शिव्या देणाऱ्यांच्या गळ्यात गळे घालून फिरतात. मी उद्धव ठाकरेंना विचारतो की, काय होतास तू काय झालास तू असा कसा वाया गेलास तू..अशा शब्दात टीका करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झुकेंगा नही साला घुसेंगा असे म्हणात ठाकरेंना आव्हान दिले.

कुचक्या मेंदुचे लोक

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ''उद्धव ठाकरे मला फडतूस गृहमंत्री म्हणाले, उद्धव ठाकरे फडतूस नही काडतूस हू मै झुकेंगा नही साला घुसेंगा'' सावरकरांबद्दल जे अपशब्द काढतात त्यांच्याबद्दल माझ्या मनात यत्किंचितही सडक्या आणि कुचक्या मेंदूचे लोक सावरकरांचा अपमान करीत राहतील तोपर्यंत जनता अशा लोकांचा विरोध करीत राहतील.

​​​​इंग्रज, त्यांच्या एजंटानी त्रास दिला

देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अतोनात अत्याचार सहन केले. ते काय होते हे सोन्याचे चमचे घेवून जन्माला आलेल्या राहुल गांधींना काय माहीत? सावरकरांनी काय भोगले हे त्यांना माहीत नाही. आधी इंग्रजांनी नंतर त्यांच्याच एजंटांनी सावरकरांना त्रास दिला, आज त्यांचे विचार मानणाऱ्या राहुल गांधींना सावरकर समजू शकत नाही. आमचे ऐकू नका पण त्यांचीच आजी इंदिरा गांधींनी सावरकरांचा गौरव केला होता.

राहुल गांधींचा सोन्याचा चमचा घेवून जन्म

देवेंद्र फडणवीस म्हणाले, सावरकरांच्या अभिनंदनाच्या ठरावाविरोधात काॅंग्रेस उभी राहीली त्यावेळी त्यांचेच आजोबा फिरोज गांधी ठरावाच्या बाजूने उभे राहीले. ज्यांचे नाव वापरता कमीत कमी त्यांचे तरी ऐका. जेवढा सावरकरांचा अपमान कराल तेवढे देशप्रेमी शिव्याशाप तुम्हाला देतील. सावरकरांनी राहुल गांधीसारखे संपवू शकत नाहीत. काॅंग्रेस अध्यक्ष सावरकरांवर लांच्छन लावतात व आमच्यासोबत राहीलेले मित्र (उद्धव ठाकरे) त्यांच्या मांडींला मांडी लावून बसतात.

असा कसा वाया गेलास तू!

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी उद्धव ठाकरेंना विचारतो की, काय होतास तु काय झालास तु असा कसा वाया गेलास तू. मणीशंकरांनी सावरकरांविरोधात अपशब्द काढल्यानंतर मणीशंकर अय्यरांच्या तोंडावर बाळासाहेब ठाकरेंनी जोडा मारला होता. उद्धव ठाकरे म्हणतात की, माझ्या वडीलांचे नाव पळवले. मी म्हणतो त्यांचे विचार कुठे गेले. त्यांची कृती सोडली म्हणून एकनाथ शिंदे मैदानात उतरले. वारसा जन्माने नाही कर्माने मिळतो.

इंग्रजापुढे हार मानली नाही

देवेंद्र फडणवीस म्हणाले, वर्षानुवर्षे स्थानबद्धता व अत्याचार होत असतानाही त्यांनी इंग्रजापुढे हार मानली नाही. अस्पृश्यांना मंदिर खुले करून दिले. जातीभेद विसरून सोबत जेवण करण्यासाठी पुढाकार घेतला. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना काळाराम मंदिरावेळीच्या आंदोलनाला पाठींबा दिला. हिंदुंची व्याख्या सावरकरांनी मांडली. अंधश्रद्धेविरोधात कार्य केले. ते विज्ञाननिष्ठ होते ते खऱ्या अर्थाने सुधारक होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, सावरकरांवर टीका काय करता.. सावरकरांनी खऱ्या अर्थाने क्रांतिची ज्योत पेटवली. सावरकरांनी लहानपणापासून बाराव्या वर्षी स्वातंत्र्यलक्ष्मीची आराधना करणारी कविता लिहील. तेव्हाच त्यांनी स्वातंत्र्य मिळवण्याची शपथ घेतली. देश कशाप्रकारे स्वतंत्र होईल याचाच त्यांच्या मनात विचार होता.

सावरकरांनी क्रांतिकारकांमध्ये प्रेरणा दिली

देवेंद्र फडणवीस म्हणाले, सावरकरांनी विदेशी वस्तूंची होळी केली, त्यावेळी त्यांचे वय लहान होते. ते तेव्हा त्याच विचाराने प्रेरीत होते. सावरकर लंडनमध्ये जातात आणि इंडीया हाऊसमध्ये बाॅंम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतले. बंदुका भारतात कशा पाठवायच्या यासंदर्भात अनुसंधान करून सशस्त्र क्रांतिचा नारा देत एक एका क्रांतिकारक​​ भारतीयांना प्रेरित करीत होते.

1857 चा 'स्वातंत्र्य संग्राम' लोकापर्यंत पोहचवला

देवेंद्र फडणवीस म्हणाले, 1857 चे भारताचे पहिले स्वातंत्र्यसमर होते हे पुस्तक त्या काळात छापू दिले नाही. जर्मनी आणि युरोपात छापण्याचा प्रयत्न केला. शेवटी हाताने लिहून ते त्यांनी क्रांतिकारकापर्यंत पोहचवले. हे स्वातंत्र्यसमर पहिला संग्राम होता.

..म्हणून सावरकरांवर कारवाया केल्या

देवेंद्र फडणवीस म्हणाले, 1857तो लढा चिरडला तेव्हा इंग्रजांना वाटायचे की, आता स्वातंत्र्य लढवणारी पिढी संपली पण एक पिढी पुन्हा भारतात तयार झाली. मदनलाल धिंग्रा असो की, लोकमान्य टिळक यांनी इंग्रजांविरोधात लढा दिला, त्यानंतर सावरकर हे देशातील क्रांतिकारकांना प्रेरणा देत होते. हे इंग्रजांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सावरकरांवर कारवाया सुरू केल्या. त्यांना अटक केली. डिग्रीही काढून घेतली.

इंग्रजांना खडे बोल सुनावले

देवेंद्र फडणवीस म्हणाले, सावरकरांवर खटले चालले. पहिली जन्मठेप नंतर दुसरी जन्मठेप मिळाली. दोन जन्मठेप मला काय देता? तुमचे राज्य तेवढे दिवस चालणार का? असेही सावरकरांनी खडे बोल इंग्रजांना सुनावले आहे. ही त्यांची हिंमत होती.

स्वातंत्र्याची आस सोडली नाही

देवेंद्र फडणवीस म्हणाले, अंदमानच्या जेलमध्ये सावरकरांना पाठवले तेव्हा तेथील अवस्था भयानक होते. तेथे अत्याचार अनेक क्रांतिकारकावर झाले, तेच अत्याचार सावरकरांवर झाले. सावरकरांचे धैर्य बघा, अशाही परिस्थितीत त्यांनी देशाच्या स्वातंत्र्याची आस सोडली नाही. ते अंदमानातील जेलच्या भींतीवर राष्ट्रभक्तीच्या कविता लिहील्या.

..पण सावरकरांना सोडले नव्हते

देवेंद्र फडणवीस म्हणाले, काॅंग्रेसवाले वारंवार म्हणतात की, सावरकरांनी माफी मागीतली पण सावरकरांनी जेव्हा अर्ज केला होता. त्यावेळी सावरकर फाॅर्मट पूर्ण वापरला पण शेवटी म्हणतात की, मला तुम्ही सोडणार नाही पण बाकीच्या कैद्यांना सोडा. महात्मा गांधींनीही सावरकरांना याचिका करा असे सांगितले. जाॅर्ज पंचम म्हणाला की, सर्व राजकीय कैद्यांना सोडू पण सावरकरांना सोडू शकले नाही.