आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्‍हणाले की:देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले पाहिजेत

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष असताना देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत, अशा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचक वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीनंतर फडणवीसांच्या बंगल्याचा पत्ता बदलणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. या चर्चेला बळ देणारे वक्तव्य बावनकुळेंनी केल्यामुळे राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत. नागपुरात संत संताजी जगनाडे महाराज यांच्या स्मारक, आर्ट गॅलरी भूमिपूजन सोहळ्यात बोलताना बावनकुळे यांनी हे वक्तव्य केले. म्हणाले, फडणवीस जातीपातीच्या बाहेर निघालेले नेते आहेत.

बातम्या आणखी आहेत...