आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्युत्तर:दोन मंत्री जेलमध्ये जाऊनही राजीनामा घेण्याची हिंमत दाखवली नाही, फडतूस कोण महाराष्ट्राला माहिती; फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन-दोन मंत्री जेलमध्ये गेले. मात्र, तुम्ही राजीनामा घेण्याची हिंमत दाखवली नाही. त्यांच्या भोवती लाळघोटेपणा केला. त्यामुळे तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. फडतूस कोण हे महाराष्ट्राला माहिती आहे, असे उत्तर गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना आज दिले. ते नागपूरमध्ये बोलत होते.

रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पोस्ट टाकली म्हणून मारहाण केल्याचा आरोप आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची आज उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी भेट घेतली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर फडतूस गृहमंत्री म्हणून टीका केली. त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्याला फडणवीस यांनी उत्तर दिले.

बोलण्याचा अधिकार नाही...

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, खरे म्हणजे माझा सवाल असा आहे की, दोन दोन मंत्री जेलमध्ये गेल्यानंतर त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत जे मुख्यमंत्री दाखवत नाहीत, जे मुख्यमंत्री त्या मंत्र्यांच्या भोवती लाळ घोटत असतात, त्यांना बोलण्याचा काय अधिकार आहे, असा सवाल त्यांनी केला. ज्यांच्या काळात पोलिस एक्सॉर्टशन करतात. आमचे तोंड उघडले तर त्यांची पळता भुई थोडी होईल. त्यामुळे संयमाने बोला. हा जो थयथयाट आहे, ते फर्स्टेशन असून, त्याला उत्तर देण्याचे कारण नाही, असा टोलाही त्यांनी हाणला.

गृहमंत्रीपद सोडणार नाही...

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, मोदींचे फोटो लावून निवडून येता. विरोधकांची लाळ घोटता. तेव्हा खरा फडतूस कोण महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. याचे उत्तर त्यांना जनता देईल. मी पाच वर्षे राज्याच्या गृहमंत्री राहिलो आहे. पुन्हा गृहमंत्री आहे. त्यामुळे अनेक लोक पाण्यात देव ठेवून बसले आहेत. मात्र, मी गृहमंत्री पद सोडणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

निष्पक्ष चौकशी करू...

देवेंद्र फडणीस पुढे म्हणाले की, मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाच्या सरकारमध्ये गृहमंत्री आहे. जो चुकीचे काम करेल त्याला जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही. एखादी घटना घडली की त्याची निष्पक्ष चौकशी करू. राजकारण करण्याचा प्रयत्न केला तर योग्य होणार नाही. कोणी चूक केली असेल त्याच्यावर कारवाई करू. चाणक्य म्हणतात की, ज्यावेळी राज्यातले चोर, डाकू, लुटेरे, अपप्रवृत्तीचे लोक राजाविरुद्ध बोलतात, तेव्हा राजा योग्य काम करतोय असे समजायचे, असा टोला त्यांनी ठाकरे यांना हाणला. मात्र, आपण राजे नसल्याचेही ते म्हणाले.

संबंधित वृत्तः

गुंडाराज:ठाकरे कुटुंबीय जखमी रोशनी शिंदेंच्या भेटीला, मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर 30 जणांचा तलवारीने हल्ला

घणाघात:शिंदे मुख्यमंत्री की गुंडमंत्री?, देवेंद्र फडणवीस फडतूस गृहमंत्री, झेपत नसेल तर राजीनामा द्यावा- उद्धव ठाकरे