आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन बिबट्यांचा मृत्यू:एक चिखलात फसून दुसरा रस्ते अपघातात ठार; नागपूर जिल्ह्यातील घटना

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर वन विभागा अंतर्गत देवलापार वनपरिक्षेत्र आणि रामटेक वन परिक्षेत्र येथे दोन वेगवेगळ्या घटनांत दोन बिबट्यांचे मृत्यू झाल्याच्या घटना गुरूवारी उघडकीस आल्या आहे. पहिल्या घटनेत ७ रोजी संध्याकाळी पटगोवरी गावानजीक सर्वे क्रमांक ३३९ येथे चिखलात फसून बिबटाचा मृत्यू झाला. बिबट चिखलात फसलेला असताना नागपूर येथील रेस्क्यु पथकाला पाचारण करण्यात आले. त्यांनी बिबट्याला वाचवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. परंतु तोपर्यंत नाका तोंडात पाणी गेल्याने बिबट्याचा मृत्यू झाला.

दुसऱ्या घटनेत ८ सप्टेंबर रोजी रात्री २ वाजताच्या दरम्यान देवलपार वन परिक्षेत्र, मानेगाव क्षेत्रातील (नॅशनल हायवे ४४) जबलपूर नागपूर हायवे वर वाहन अपघातात एका बिबट्याचा मृत्यू झाला. वन विभागाने राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शिके नुसार दोन्ही बिबट्याचे शव विच्छेदन गुरूवारी करण्यात आले. यावेळी उपवन संरक्षक डॉ. भारत सिंह हाडां, सहायक वनसंरक्षक नरेंद्र चांदेवार, प्रधान मुख्य वनसंरक्षकांचे (वन्यजीव) प्रतिनिधी अविनाश लोंढे, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे प्रतिनिधी कुंदन हाते, वैद्यकीय पथक डॉ. सुबोध नंदागवळी, डॉ. एम. डी. पावशे, डॉ. सुजित कोलांगत, डॉ. एस. पी. काकडे आणि वन कर्मचारी उपस्थित होते.

यापूर्वी १० ऑक्टोबर २०१८ मध्ये पेंच व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या पिपरीया गावाजवळील बिबट्याच्या पिल्लाचा अपघातात मृत्यू झाला होता. रात्रीच्या वेळी रस्ता ओलांडताना वाहनाच्या धडकेत या बिबट्याच्या पिल्लाचा मृत्यू झाला होता. तर ३० सप्टेंबर २०२० रोजी नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील नयाकुंड शिवारात बिबट्याचा मृतदेह दिसून आला होता.

ज्ञानेश्वर बारसाखरे या शेतकऱ्याच्या शेतात काम करणाऱ्या मजूरांच्या लक्षात ही बाब आली होती. विषप्रयोग अथवा कुंपणात साेडलेल्या वीज प्रवाहाचा धक्का लागून मृत्यू झाल्याचा अंदाज त्यावेळी व्यक्त करण्यात आला होता. नागपूर जिल्ह्यात अपघातात वन्यजीव ठार होण्याच्या घटनांमध्ये अलिकडे वाढ होत आहे. जंगलातून जाणाऱ्या महामार्ग तसेच रस्त्यावरून वाहनचालकांनी वाहने हळूहळू चालवावी असे आवाहन वनखात्याने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...