आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:‘त्या’ कार्यक्रमाला दिलीपकुमार 3 तास थांबले!; नागपूर येथील निवेदक किशन शर्मा यांनी सांगितली आठवण

नागपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • साळवे यांच्याशी विशेष स्नेह

वर्धा रोड स्थित साई मंदिराला गानकोकिळा लता मंगेशकर यांच्यापासून धर्मेंद्र हेमामालिनीपर्यंत अनेक मोठ्या कलावंतांनी आजपर्यंत भेटी दिल्या आहेत. विशेष म्हणजे, या साई मंदिराच्या उभारणीत अभिनय सम्राट दिलीपकुमार यांचा सिंहाचा वाटा आहे. साई मंदिरासाठी जमीन खरेदीसाठी आयोजित मदत निधी संकलन कार्यक्रमात दिलीपकुमार पूर्ण वेळ थांबले होते. ख्यातनाम निवेदक किशन शर्मा हे त्या कार्यक्रमाचे निवेदक होते. शर्मा यांनी दिलीपकुमार मनाने किती मोठे होते, हे आठवणीने सांगितले.

नागपुरातील एन. के. पी. साळवे यांच्याशी दिलीपकुमार यांचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध होते. १९७० पासून ते साळवे यांच्याकडे येत होते. नागपुरात साई मंदिरासाठी जमीन खरेदीसाठी पंडित भीमसेन जोशी यांच्या गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन १९७३-७४ मध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमात दिलीपकुमार प्रमुख अतिथी होते. आणि लोक दिलीपकुमार यांना ऐकण्यासाठी आले होते. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी निवेदक किशन शर्मा यांनी दिलीपकुमार यांना माहिती दिली की, “तुम्ही पंडित भीमसेन जोशी यांच्या मैफिलीपूर्वी बोलून निघून गेलात तर नंतर गाणे ऐकण्यासाठी कोणी थांबणार नाही.

लोक तर तुम्हाला पहिले ऐकण्यासाठी इच्छुक आहेत’’, असे शर्मा यांनी सांगितले. त्यावर दिलीपकुमार यांनी मार्ग काढला. प्रारंभी दोनच मिनिटे बोलून त्यांनी रसिकांना आपण पूर्ण वेळ कार्यक्रमात थांबणार असून भीमसेनजींचे गाणे झाल्यावर संवाद साधणार असल्याचे सांगितले. व खरोखर ते पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत थांबले. त्यांनी गायक वादक कलाकारांची नावे लिहून घेतली.

साळवे यांच्याशी विशेष स्नेह
काँग्रेसचे दिवंगत खासदार एन. के. पी. साळवे यांच्याशी दिलीप साहेबांचा स्नेह होता. त्यांच्या घरी ते नेहमीच येत असत. नागपूरचे ख्यातनाम शायर डाॅ. मंशा उर रहमान यांच्या सन्मानार्थ आयोजित ‘जश्न ए मंशा’ हा त्यांच्या गजल गायनाच्या कार्यक्रमालाही ते उपस्थित राहत होते.

बातम्या आणखी आहेत...