आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्याता यापुढे भुकूंप, त्सुनामी, महापूर, बाॅम्बस्फोट, रस्ते अपघात आदी नैसर्गिक आपत्तीत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या चमूसह "आपदा मित्र' आणि "आपदा सखी' ही मदतीला धावून येतील. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा "आपदा मित्र' कार्यक्रमाची अंमलबजावणी राज्यातील सुमारे २० जिल्ह्यांत करण्यात येत असून यासाठी ७ हजार ९०० जणांची निवड करण्यात आलेली आहे, अशी माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे राज्य समन्वयक सागर वाळजु यांनी दिली.
या आपत्ती मित्रांना मानधन दिले जाणार नाही. त्यांचा तीन वर्षांसाठी पाच लाख रूपयांचा विमा काढण्यात आला आहे. या शिवाय १५ हजार रूपयांची एक माउंटरिंग बॅग देण्यात आली आहे.
कोणत्या जिल्ह्यांचा समावेश?
यामध्ये नागपूर, अहमदनगर, पुणे, नाशिक, नांदेड, ठाणे, सातारा, जळगाव, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांत प्रत्येकी ५०० आपदा मित्र, गडचिरोली, चंद्रपूर, रत्नागिरी, भंडारा, परभणी, अमरावती, नंदुरबार, सांगली, रायगड या जिल्ह्यांत प्रत्येकी ३०० आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०० आपत्ती मित्र व सखी राहाणार असल्याची माहिती वाळजु यांनी दिली.
निवड झालेल्या सर्व आपत्ती मित्रांचे दहा ते बारा दिवसांचे रितसर निवासी प्रशिक्षण करण्यात आले. यात भुकूंप, त्सुनामी, महापूर, बाॅम्बस्फोट, रस्ते अपघात, जंगली प्राण्यांचे रेस्क्यु इत्यादी विषयावर सविस्तर माहिती व बचाव करण्यासाठीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. भविष्यात आपदा मित्रची जबाबदारी महत्वाची राहणार आहे. यासाठी सर्व प्रशिक्षणार्थींना व्यवस्थित प्रशिक्षण देण्यात आल्याचे यांनी सांगितले.
बचाव- मदत- पुर्नवसन
आपत्तीच्या वेळी प्रशासनाला सर्वसामान्य नागरिकांचे सहकार्यही मिळण्याची गरज आहे. रेस्क्यू, रिलिफ आणि रिहॅबिलिटेशन या तीन "आर'ची आपत्तीचा सामना करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका आहे. या योजनेचा उद्देश समुदाय स्वयंसेवकांना आपत्तीनंतर त्यांच्या समुदायाच्या तत्काळ गरजांना प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक कौशल्ये प्रदान करणे आहे.
निवासी प्रशिक्षणामध्ये अग्निशमन प्रात्यक्षिक, रोड सेफ्टीबाबत जनजागृती, बोट कशी चालवायची, विषबाधा झाल्यास काय करावे तसेच प्राथमिक उपचार, पूर, भूकंप इत्यादी आल्यास काय करावे याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. नागरिकांना आपत्तीच्या काळामध्ये आपदा मित्र व सखी यांची मदत होणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.