आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्सक्लुझिव्ह:पाच लाख पुरुषांवर नसबंदी शस्त्रक्रिया होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ 8 हजार 698 एवढ्याच शस्त्रक्रिया

अतुल पेठकर | नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रगतिशील महाराष्ट्रात पुरुषांच्या नसबंदीचे प्रमाण फक्त १६ ते १७ टक्के, महिलांवर होणाऱ्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेची टक्केवारी ५० ते ७० पर्यंत

स्त्री-पुरुष समानतेचा कित्येक वर्षांपासून सामाजिक आणि शासकीय स्तरावर कितीही गवगवा करण्यात येत असला तरी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया महिलांनाच करावी लागत असल्याचे चित्र पुरोगामी आणि प्रगतिशील महाराष्ट्रात दिसून येत आहे. गैरसमज आणि पौरुषत्वाच्या खुळामुळे नसबंदी शस्त्रक्रियेत पुरुषांकडून महिलांनाच पुढे केले जात आहे. राज्यात २०१८-१९ ते २०२२-२३ या कालावधीतील कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेच्या आकडेवारीनेही या वास्तवावर शिक्कामोर्तब केले आहे. महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेची टक्केवारी ५० ते ७० टक्क्यांपर्यंत असताना पुरुष नसबंदीचे प्रमाण फक्त १६ ते १७ टक्के आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांमध्ये महिलाच आघाडीवर आहेत. २०१८-१९ मध्ये राज्यात ५ लाख १५ हजार ५०० महिलांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ३ लाख ९० हजार २९१ महिलांची शस्त्रक्रिया झाली. ५ लाख पुरुषांची नसबंदी शस्त्रक्रिया अपेक्षित असताना ८ हजार ६९८ पुरुषांनीच ही शस्त्रक्रियाकरून घेतली.

१९७७ पर्यंत स्थानिक प्रशासनाला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया तसेच नसबंदीचे उद्दिष्ट देण्यात येत होते. सरकारी पातळीवर शिबिरे घेऊन शस्त्रक्रिया केल्या जात. १९७७ नंतर उद्दिष्टमुक्त दृष्टिकोन अंगीकारण्यात आला. आता कोणावरही जबरदस्ती करता येत नाही, असे सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...