आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यभार स्वीकारला:महानिर्मितीचे नवे खनिकर्म संचालक दिवाकर गोखले

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाकर गोखले यांनी नुकताच महानिर्मितीच्या संचालक (खनिकर्म) पदाचा कार्यभार स्वीकारला. महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. गोखले यांनी खनिकर्म शाखेची अभियांत्रिकी पदवी आणि एम.बी.ए.(एच.आर.) पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ते व्ही.एन.आय.टी. नागपूरचे माजी विद्यार्थी आहेत. कोल इंडियाच्या भूमिगत आणि खुल्या खाणीतील कोळसा उत्खननाच्या संचालन आणि विविध तांत्रिक कामांच्या सुमारे ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर वेकोलिच्या उमरेड जिल्हा नागपूर येथून महाव्यवस्थापक (खाणकाम) म्हणून नुकतेच ते सेवानिवृत्त झाले आहेत.

कोळसा खाण प्रकल्पासाठी वन आणि शासन यांचा समावेश असलेली जमीन संपादन करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. वेकोलिच्या उमरेड भागात फर्स्ट माईल कनेक्टिव्हिटी/सायलो प्रकल्प विकसित करण्यासाठी खाणींमधील पायाभूत सुविधांच्या विकासाचे धोरण आखण्यात त्यांची निर्णायक भूमिका होती.

बातम्या आणखी आहेत...